Friday 20 May 2016

फरक करता यायला हवा


"फरक करता यायला हवा"

काय हो, तुम्हाला असं नाही वाटत कधी की, आपण फारच अघळपघळ वागतो. म्हणजे आपल्या विचारांमध्ये 'स्पेसिफिक' अस् जरा कमीच् आहे म्हणुन ?(अस् म्हणतात की, आपल् मागणं जर् स्पेसिफिक नसेल, तर देव पण ते पुर्ण करंत नाही.. पण असो, तो जरा दूसरा विषय आहे.)
म्हणजे विचारांमध्ये असं 'ठराविकपणं' येण्यासाठी काही सारख्या, समानार्थी भासणाऱ्या गोष्टीमध्ये आपल्याला फरक करता यायला हवां, असं मला वाटतं.
आता हेच पाहाना.. हुशारी आणि शहांणपणं हे दोन शब्द वरवर जरी एकच वाटले, तरी हुशारी ही अभ्यासापुरतीच मर्यादीत ठेवता यायला हवी.. तिचा उपयोग मित्रांसमोर करण्यात काहीच अर्थ नाही. मित्रांबरोबर वागताना शहाणपणंचं कामाला येतं.
आता मित्रांचा विषय निघालाच् आहे तर, (खुष मस्करे) दोस्त आणि खरे मित्र( हे फार्फार तर 2,3 असतात.) हयात ही फरक करता यायला हवा. सगळ्यांना ह्याचा अनुभव असेलच्.( संकट काळी मदत करतो, तोच खरा मित्र, असं म्हणतात ते उगाच् नाही. असो.)
जे सध्या शिकत आहेत, किंवा सध्या पोटार्थी काही काम करत आहेत, त्यांना जॉब आणि करियर हयात फरक करता यायला हवा, म्हणजे पुढे जाऊन होणारी घुसमट टाळता येईल.
आणि हो, काम करताना होणारी दगदग् व घ्यावी लागणारी मेहनत, हयात ही फरक करता यायला हवा. कारण सध्याच्या जगात इलेक्ट्रॉनिक्स मुळे 'मेहनत' अशी ही उरलीच नाहीये. आहे ती फक्त दगदग. कदाचित्, त्यामुळेच आपण अपेक्षित मेहनत न केल्यामुळे अपेक्षित 'फळ' मिळत नसेलं. म्हणून दगदग आणि मेहनत हयात फरक करायला हवा.
इलेक्ट्रॉनिक्स मुळे माहितीचा खजिना आपल्या बोटांवर नाचतोय सध्या..(पूर्वी जिभेवर सरस्वती नाचायची.काळाचा महिमा, दुसरं काही नाही. असो.) पण महत्व त्यालाचं असतं, जो ज्ञानी आहे. त्यामुळे माहिती आणि ज्ञान हयात फरक हा करता यायलाच हवा.
(आणि माहितीला ज्ञानामध्ये 'कन्वर्ट' करता यायला हवं.)
काम करतानाही, मग ते कोणतही असू दे, कामात 'बिझी'असणं आणि 'खरंच काम करणं' हयात फरक करता यायला हवा.. कारण,आपण जेव्हा मी बिझी आहे, अस् म्हणतो, तेव्हा बऱ्याच वेळेला आपण स्वतः चीच खोटी समजूत काढत असतो.( लहानपणी नाही का, आपण दिवसभर अभ्यासामध्ये बिझी असायचो, पण डोक्यात फार कमी शिरायच्, तसचं. असो.).. (हे 'असो, असो' फारच होतय् का आज? असो). म्हणून पुढच्यावेळी आपण बिझी आहोत का खरचं काम करतोय हयात फरक करायला हवा.
स्वैराचार आणि स्वातंत्र्य हा अगदी चोथा झालेला विषय आहे. पण म्हणजे नेमकं काय? हे कोणाला नीटसं माहिती नसल्यामुळे आपल् वागण् कशात मोडतं, ह्याच आकलन बऱ्याच जणांना होत नाही.
स्वैराचार म्हणजे बुद्धि न वापरता, इतरांच्या भावनांची दखल न घेता केलेलं कृत्य.. तर स्वातंत्र्य म्हणजे ''Courage with Consideration".
त्यामुळे देशाचे नागरिक म्हणून वावरताना स्वैराचार आणि स्वातंत्र्य हयात फरक करता यायला हवा.
सध्या इथेच थांबतो. उर्वरीत पुढील ब्लॉग मधे..

No comments:

Post a Comment