Monday, 2 May 2016

निर्णयक्षमता

.....
...   योग्य निर्णय कसा घ्यायचा हा आपल्या सर्वांना पडणाऱ्या प्रश्नाच उत्तर मला कसं मिळाल, ह्याचा हा अनुभव..
ह्या गोष्टीचा शेवट झाला तो "स्वामी समर्थ" केंद्रात..
काही दिवसांपूर्वी माधव माझ्याकडे आला होता. बऱ्याच दिवसांपासून माझी अन् त्याची भेट झाली नव्हती.. पण तो मला नेहमी आपण भेटुयात, मला बोलायच् आहे, असा फोन करुन म्हणायचा. शेवटी आज आमची भेट झाली.
मी स्वामी समर्थ केंद्रात निघालो होतो. त्यालाही मी सोबत घेतलं. तिथे गेल्यावर दर्शन घेवून मीच त्याला बोलत केलं. त्याच्या वयाच्या, म्हणजे 25 वर्षाच्या मुलाचा जो प्रश्न असतो, तोच ,म्हणजे करियर संबधित होता. माधव जरा त्रस्त झाला होता. त्याचं शिक्षण पोस्ट ग्रॅजुएट पर्यंत झालं होतं.
पण त्याला कळत नव्हतं की पुढे काय करावं? म्हणून तो मला भेटायला आला होता.
"दादा" माधवने सांगायला सुरुवात केली. " मला निर्णय घेता येत नाहीये की, मी नेमकं काय करावं? घरचे मागे लागलेत, मी लवकरात लवकर माझ करियर सुरु कराव म्हणून .."
"म्हणजे?" मी विचारलं.
"दादा, तुला माहितीये की, मी पोस्ट ग्रॅजुअशन बरोबर गाण्याच् ही शिक्षण घेतलय. अन् मला आता कळत नाहीये की, मी एखादी कंपनी जॉइन करावी का गाण्यातचं मला सिद्ध कराव्?"
"तुझा कल कशाकडे आहे"?
"सध्या माझा कल दोन्हीकडे आहे. जर मी कंपनी जॉइन केली तर, मी भरपूर पैसे कमवु शकेन, माझी स्वप्न पूर्ण करू शकेल..ह्या मिड्ल क्लास लाइफ मधून लवकर सुटता येईल.. समाजात एक स्टेटस निर्माण होईलं, अन् लग्न ही लवकर जमेलं."
".......
"अन् गाण्यात करियर करायच म्हंटल, तर खुप स्ट्रगल करावा लागेल. सगळ अनिश्चित्त वातावरण असणार.. पण गाण मला मनापासून आवडतं. तुम्हीच सांगा मी काय निर्णय घेवू?"
खरंच ह्या प्रश्नाच् उत्तर देण जरा अवघड होत. कारण दुसऱ्या कोणाने सुचवलेल करियर तिसऱ्याने कराव्, ह्या मताचा मी नाहीये. आपला निर्णय आपणच घ्यायचा असतो, हे माधवला कसं समजाव ह्याचा विचार मी करू लागलो. मी केंद्रात आजु बाजूला नजर फिरवली.. अन् मला माधव च्या प्रश्नाच् उत्तर मिळालं.
मी माधवला समोर काय दिसतयं ह्याच वर्णन करायला सांगितल. जरा विचित्र पणे माझ्याकडे पाहून तो वर्णन करू लागला..
"काही माणसं स्वामींच्या तस्वीरी समोर बसून पठण करतायेत्.. काही औदुंबराला फेऱ्या घालत आहेतं."
"अन् ती लहान लहान मुलं आहेत, ती काय करत आहेत"?
"ती.. कुत्र्यांच्या लहान पिलां बरोबर खेळताहेत.."
"आता मला सांग.. पिलांबरोबर खेळणारी लहान मुलं आणि देवासमोर बसलेली प्रौढ़ माणस, ह्यांच्यात जास्त आनंदी, समाधानी कोण दिसतय तुला"?
"एक मिनिट दादा. मला जरा निरिक्षण करू दे".
"अरे दादा, मुलं आणि मोठी माणसं, दोघही समाधानी आणि आनंदी आहेतं"
"हेच तुझ्या प्रश्नाच् उत्तर आहे माधव. तू स्वतःला ह्यापैकी एका ग्रुप मधे ठेव. हे दोन्ही ग्रुप आपली आपली काम करत आहेत."
" लहान मूलं, आपण मंदिरात आलोय, म्हणून शांत न बसता, त्यांच्या स्वभावाप्रमाणे वागत आहेत, तर मोठी माणसं त्यांचा स्वभावा नुसार वागत् आहेत."
"तुही तुझ् करियर असंच निवड. ज्यात तुला अधिक आनंद भेटेल. क्षणिक समाधान न मिळता, टिकणार समाधान तुला कशात आहे, ह्याचा आधी विचार कर. आणि मगच् निर्णय घे. ह्यात इतर मित्र काय म्हणतील, ह्यापेक्षा तुला आणि तुझ्या घरच्यांच्या आनंदाचा विचार कर्. तुला निर्णय घेण् सोप जाईल."
माधव ला त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी उत्तर मिळाल होतं. लवकरच विचार करून, घेतलेला निर्णय कळवण्याच वचन देवून माधव समाधनाने गेला. त्याच्या निर्णयाची वाट मी बघतोय.
श्री स्वामी समर्थांनी मार्गदर्शन करून आम्हा दोघांनाही पुढच्या आयुष्यभरासाठी निर्णय क्षमता दिली होती.
(काही संदर्भ वगळता, ही कथा बऱ्याच अंशी सत्य आहे.)
गौरव नायगांवकर.

No comments:

Post a Comment