"खरा पराभव"
..शेवटी एकदाची ती उपांत्य पूर्व फेरीची टेनिस मॅच संपली.
त्याला बराच झुंजाव लागलं , पण शेवटी तो हरलाच.खर पाहता, तो जिंकायला हवा होता. कारण तो नॅशनल लेवल वरचा चॅम्पियन होता, अन् प्रतिस्पर्धी तर अगदीच नवखा होता. पण प्रतिस्पर्ध्याने अगदी मनापासून खेळ केला.
प्रथेप्रमाणे प्रतिस्पर्ध्याने सामना संपल्यावर शेक-हॅंड साठी हात पुढे केला, पण त्याने तो झिडकारला. हरणं फारच जिव्हारी लागल होत त्याच्या..
प्रशिक्षक समोर येताच त्याचा स्वतः वरचा ताबा सुटला. हातातली लकी रॅकेट फेकून त्याने आरडाओरडीला सुरुवात केली.. " मी हरुच् कसा शकतो? त्याची लायकी तरी होती का, माझ्या समोर उभं राहण्याची? अन् चालला मला शेक- हॅंड करायला..खर तर माझीच जास्त लायकी आहे सेमी फायनल ला खेळण्याची.. हे असं नेहमी माझ्या सोबतच् का होत नेहमी.. देव पण मलाच असली शिक्षा का देतो? पहा कसा मिरवतोय तो जिंकल्यावर्.. पुढे जावून नक्कीच हरणार तो.. माझा शाप आहे त्याला.. सर, खर तर तुमचीच चूक आहे ही.. तुम्हीच नीट प्रॅक्टीस करून घेतली नसणार माझ्याकडून, म्हणून तर मी हरलो ना.. नाहीतर मी हरुच् शकत नाही.अन् मला सांगा, तुम्ही त्याच अभिनंदनच का केलतं?”
असचं काही बाही बडबडत् सुटला तो..
अन् इथेच खराखुरा पराभव झाला त्याचा.. "हरणं" हा खेळाचाच एक भाग असतो, हे त्याने समजून घेतलचं नाही.. एका हरण्याने आयुष्य थांबत नाही, हे तो शिकलाच नव्हता..
त्यासाठी स्वत:च नुकसान देखील त्याने करून घेतल होतं.
खेळावरच्या प्रेमापेक्षा, हरण्यावरच्या रागाला त्याने जास्त महत्त्व दिलं.
No comments:
Post a Comment