Friday, 20 May 2016

स्थायीभाव

"स्थायीभाव"
..गेले काही दिवस त्याच्या मनाची जीवघेणी घालमेल होतं होती. कशातच् लक्ष लागत नव्हतं.
एकच प्रश्न वारंवार छळत् होता..
"मी इतकं प्रेम केल् तिच्यावर.. इतका जीव लावला तिला.. तिने झिडकारल् आपल्याला, तरी अजूनही आपण तिच्यावर इतकं बेफाम, आणि खरं प्रेम कस् करू शकतोय? "का"?? तगमग झाली होती त्याच्या जीवाची..
तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. त्याने आशेनी पाहिलं, पण नंबर मित्राचा होता. वाटल, नको उचलायला. पण सवयीने फोन उचलला.
"अरे सॉरी.. काल तूला मला तिच्याबद्दल सांगायच होतं, पण मला खरंच वेळ नव्हता.. आता परत भेटल्यावर सांग. बरं.. माझ एक काम होत रे तुझ्याकडे..
" माझ्याकडे संध्याकाळी एक क्लायंट येतोय.. त्याला प्रेझेंटेशन द्यायचय.. मग तेवढा एक प्रोजेक्ट रिपोर्ट करून देना.. मी डिटेल्स मेल करतो." मित्राच् कालचं वागण् आठवूण तो त्याला नकार देवु शकत होता, पण त्याने मदत करायला हवी असा निर्णय त्याच्या मनाने नकळतच घेऊन टाकला. फोन वरच थोडी बहुत माहिती विचारली.
"बरं. दे पाठवून. मी करतो."
होकार देऊन त्याने फोन ठेवला, अन् अचानक त्याला त्याच्या वागण्याच् कारण गवसल्..अन् मन हलक हलक झालं.
तगमग संपली, मनात एक आनंद भरून वाहु लागला. तिच्यावर अस् भरभरुन प्रेम का केल्, ह्याच उत्तर मिळालं.
जगाने त्याला कसंही वागवलं, तरी जगाशी चांगलचं वागण् हा त्याचा स्थायीभाव होता. इतरांना मदत करण, हे जसं त्याच्या आतून येत होत, तसंच तिच्यावरच प्रेम आतून आल होत.
त्याच् अस् निस्वार्थ,बेफाम 'खरं प्रेम' करता येणं हे तिचं कतृत्व नव्हतं, तर ह्याचाच तो स्वभावगुण होता.. देवासारखा.. दोष दिला तरी कृपा करणारा. मग तो फक्त कामापूरता आठवण काढणारा मित्र असो, की एक सोयीचा खांदा म्हणून बघणारी मैत्रीण असो.. हा सर्वांशी चांगलच् वागणार होता, सर्वांवर प्रेम करणार होता.
आपल् हे वागणचं खरं आहे, हाच आपला स्थायीभाव आहे, हे जाणून मित्राच्या मेल ची वाट पाहु लागला.

No comments:

Post a Comment