Wednesday 25 January 2017

नुक्कड साहित्य "स्नेहमिलन"

(आमच्या वार्ताहराकडुन) May 2017.
..तर काल दोन दिवसीय 'नुक्कड साहित्य स्नेहमिलन" संपन्न झालं.
नावापासूनच वेगळेपण जपणाऱ्या ह्या 'स्नेह-मिलन'ने सम्पूर्ण साहित्य विश्वाला आपली दखल घ्यायला लावली, हे मात्र खरं..
पण,  असं वेगळं काय होतं? हे जाणून घ्यायला आमच्या वाचकांना नक्कीच आवडेल.


...."नुक्कड" च्या संमेलनाची सुरुवातच झाली, ती लेखक आणि वाचक ह्यांच्या समावेशातून.. महाराष्ट्रात 'साहित्य'हे फक्त लेखकांपूरतच मर्यादित कधीच नव्हतं.. त्याचा वाचकवर्ग ही एक मुख्य भाग राहिला आहे..
.. आणि हेच सत्य लक्षात घेऊन "नुक्कड" च्या साहित्य संमेलनाची आखणी झाली होती.. म्हणजे ह्यात काय असावं, काय असू नये इथपासून ते स्थळ, काळ, वेळ ह्यातही लेखक आणि वाचक ,ह्या दोन्ही घटकांनी प्रमुख भूमिका निभावली.
आणि सर्व ठरल्यावर हे दोन दिवसीय स्नेहमीलन पार पडलं..
.........
             पण, इथेच हे वेगळेपण संपत नाही. कारण ह्या संमेलनात लेखक आणि वाचक ही दरी मिटवून टाकण्यात आली होती.. ईतर साहित्य संमेलनात लेखकांसाठी मंच/स्टेज असतो, आणि वाचकांसाठी समोर बसण्यासाठी खुर्च्या असतात.
पण अशा अरेंजमेंट मुळे लेखकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या वाचकांना आपल्या जिवाभावाच्या लेखकांना भेटता येत नाही, आणि ह्या दरी मुळे संमेलनाच्या शेवटी वाचकांना "आम्हाला ह्यातून काय मिळालं?" असा प्रश्न पडत असतो.. पण ही दरी इथे नव्हतीच..
             ..इथे चक्क लेखक आणि वाचक ह्यांच्यात हा दुरावा मिटवून टाकण्यात आला होता. स्टेज/ मंच अशी भानगड न ठेवता, भारतीय बैठक मांडण्यात आली होती, ज्यावर लेखक अन वाचक मिळूनमिसळून बसले होते, आणि त्यावरून 'स्नेहमिलन' हे नाव सार्थ ठरत होतं.
लेखक- वाचक संवाद ह्या खेळीमेळीच्या वातावरणात किती आनंदात पार पडला असेल,हे वेगळं सांगायला नकोच. (अर्थात मान्यवरांची विशेष व्यवस्था करण्यात आली होती,पण नंतर ते देखील ह्या संवादात 'सामील' झाले.)
             
                  आणि मान्यवर, लेखक आणि वाचक ह्यांच्या ह्या बैठकीत पुस्तकं, वाचकांची त्यावरची प्रतिक्रिया, लेखकाबद्दलची वाचकांना, आणि लेखकाना त्यांच्या वाचकांबद्दल असलेली उत्सुकता, हे सर्व ह्या स्नेहमिलनात अनुभवायला मिळालं.
ह्यांनंतर गझल, कविता आणि काही निवडक कथांच वाचन पार पडलं.
              .. पण ह्या सर्वावर 'सोने पे सुहागा' ठरलं, श्रीविक्रम भागवत ह्यांनी वाचकांसाठी  घेतलेलं 'वर्कशॉप'..
ह्या 15 मिनिटांच्या वर्कशॉपमध्ये भागवत ह्यांनी 'लेखन कार्यशाळा' घेऊन वाचकांना चक्क 'लेखक' बनण्याचा अनुभव घेऊ दिला..वाचकांनी काही काळासाठी तरी 'लेखक' बनून आपल्या भावना 'लिहून' व्यक्त केल्या.
.. असं हे सर्वसमावेशक संमेलन, नव्हे, "स्नेहमिलन", ज्यात कुठलाही बडेजाव नव्हता, ना दिखावा होता.. इथे साहित्यिक- सामान्य माणूस हा 'भेदाभेद अमंगळ'  मानून सर्वाना सामावून घेण्यात आलं होतं.. जी सम्पूर्ण महाराष्ट्रासाठीच अभिमानाची गोष्ट आहे.  "साहित्य संमेलनातून आम्हाला काय मिळतं?" हा सर्व सामान्यांना पडणारा प्रश्न ह्या सर्वसमावेशक साहित्य संमेलनाने निकालात काढला, हे मात्र खरं.. आणि  फेसबुकच्या जमान्यात आजची तरुणाई ही साहित्याशी आपली नाळ जोडून आहे,(ते ही फेसबुक चा वापर करून) ही सुखावणारी गोष्ट आहे. हे स्नेहमीलन साहित्यिक आणि वाचक ह्यांच्याबरोबर महाराष्ट्राची सांस्कृतिक झोळी आनंदाने भरणार ठरलं.
असं हे नुक्कडचं पहिलंच संमेलन परत कधी भरणार, ह्याची हुरहुर घेऊनच सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.

No comments:

Post a Comment