Thursday, 11 December 2014

"Alternate Paradigm " # 6 

(Continue from Alternate paradigm # 5)



“We are starting with new Dharma and New GOD." आम्हाला भयंकर आश्‍चर्यात टाकत प्रथमेश म्हणाला.
"नवीन धर्म आणि नविन देव ?" म्हणजे?" सर्वानी गोंधळून विचारल।
"संगतो. आपण step by step जावुयात।"  प्रथमेश म्हणाला.

“आता OD ची कॉन्सेप्ट आपण, ऑफ कोर्स, वेस्टर्न मॅनेज्मेंट कडून आपल्याकडे आली. पण श्रीकृष्णा ने अगोदरच OD बद्दल बोलून ठेवलय.”

पण त्या अगोदर  आपण “OD” ह्या मॅनेज्मेंट कॉन्सेप्ट बद्दल समजून घेवुयात.
प्रथमेशने ट्रेनिंग हॉल मधे असलेल्या ड्रॉयिंग बोर्डवर “मिंग्लिश” मधून  लिहायला सुरूवात केली.
                                What we exactly do in OD?
अ) Why any organisation go for OD?-  Of course, जेव्हा आपल्याला आपल्या कंपनीतला जास्त Effective  बनवायच असत, किंवा चेंजिंग कॉर्पोरेट एन्वाइरन्मेंट मधे sustain  व्हायच असत तेव्हा.

ब)Then, we identify, which factors are contributing and which are against OD? - म्हणजे  आपल्या OD  च्या ऑब्जेक्टिव ला कंट्रिब्यूट करणारे, ज्याला जनरली, “Negative Forces ”अस् उल्लेखल  जात, असे फॅक्टर्स आपण किंवा सिस्टम्स आपण ‘Delete ’ करतो.

सी) Then we find out those factors, which are necessary for OD- असे फॅक्टर्स जे OD च्या ऑब्जेक्टिव ला सपोर्ट करणारे असतात, and Optimum potential utilize करतात , एक  एफेक्टिव कल्चर तयार  करतात.

द) Considering above two, we establish an OD system to make the oragnisation more efficient.

“तुम्ही सर्व agree  आहात ह्याला?”प्रथमेश ने लिहून झाल्यावर आम्हाला विचारल.

“हो, बरोबर आहे.” आम्ही होकार दिला.

भग्वद्  गीतेताला  “यदा यदा  ही धर्मस्या ग्ला नीर् भवती  |
अभयुततनं आधर्मस्या तदात्मनात  सजम्य अहं ||4-7||
परीत्रानाया साधूनाम् विनाशाया का दुष्कृटां
धर्मा-संस्थापणार्तआया संभवामी युगे युगे ||4-8||

हे दोन श्लोक सगळ्यानी  ऐकलेलेच आहेत. ह्या दोन्ही श्लोकांचा सर्वसाधारण धार्मिक अर्थ असा आहे.- जेव्हा जेव्हा धर्माला  ग्लानी  येते, अधर्म वाढु लागतो,  तेव्हा मी, म्हणजे श्री कृष्ण अवतार घेतात. का? तर जे काही चांगल आहे, त्यांच्या रक्षणार्थ, आणि जे काही वाईट आहे , त्याच्या  विनाशासाठी.
          ह्या दिन्ही श्लोकातून अर्थ मॅनेज्मेंट च्या पर्स्पेक्टिव मधून असाही लावता येतो- 
जेव्हा धर्म म्हणजे Ethic Organistion Culture or Brand, Position, value system , Best management practices  ह्या Obsolete  किंवा Deteriorate  होतात तेव्हा, त्या रिस्टोर करण्यासाठी, आणि Evil Forces  ला नष्ट करण्यासाठी एका नवीन अवतारची गरज असते. अन हा  नवीन अवतार तुमच्यासमोर आहे.”
" असे आश्चर्याने बघू नका. मी स्वत : ला अवतार म्हणून घेत नाहीए, तर “आल्टरनेट पॅरडाइम” ला अवतार म्हणतोय. आणि अवतार म्हणजेच मॅनेज्मेंट च्या Language  मधे “Model ”. 

“तर आता आपण गीतेतले  हे श्लोक आणि OD  ची प्रोसेस ह्यांच relation  एक-एक करून डीटेल मधे Discuss  करूयात.” प्रथमेश  आता full  form  मधे आल्यासारखा  वाटत होता. 



अ) Why any organisation go for OD?- तर ,श्लोकप्रमाणे “धर्म म्हणजेच आपला Brand, Value system,culture ” इत्यादी फॅक्टर्स ला नव्याने Establish  करण्यासाठी. अमेरिकेत आपल्याला स्वताला Establish  करायाच आहे. त्यासाठी आपल्याला सध्याच्या वेस्टर्न मॅनेज्मेंट मधून बाहेर पडायच आहे. म्हणजेच  आपण आपली “आल्टरनेट पॅरडाइम” ही कॉन्सेप्ट वापरणार आहोत. ओके ? 

ब) Then, we identify, which factors are contributing and which are against OD? .-  आपण अमेरिकेत सगळ नव्याने सुरू करणार आहोत, त्यामुळे, नो डाउट, आपण OD  साठी वेस्टर्न मॅनेज्मेंट वापरु शकतो. पण तिथे सगळ काही नक्कीच सोप्प नसणार. कारण, ज्या अमेरिकन कंपनीने आपल्यासोबतच Tie-up कॅन्सल केलाय, ती Directly - Indirectly आपली Competitor  असणार. तसच, ज्या मॅनेज्मेंट च्या कॉन्सेप्ट आहेत, त्या वेस्टर्न कॉर्पोरेट कल्चर ला डोळ्यासमोर ठेऊन तयार करण्यात  आल्या आहेत. त्यामुळे आपण भारतीय जेव्हा त्या Blindly फॉलो करतो, तेव्हा फार Stress  निर्माण होतात, आपल पर्सनल लाइफ आणि प्रोफेशनल लाइफ डिस्टर्ब होत. वेग-वेगळे हेल्थ Problems  त्रास देतात. आता  आपण डाइरेक्ट अमेरिकेतच जाणार असल्यामुळे ह्या सर्व गोष्टी Multiply  होऊन आपल्यावर अफेक्ट करणार. म्हणजेच हे फॅक्टर्स “नेगेटिव फोर्सस’’ आहेत, ज्यांना मी श्लोकाप्रमाणे “ईविल फोर्सस” हे नाव दिलाय. बर, पटताय माझ म्हणन तुम्हाला?’’ प्रथमेश ने विचारल  
त्याच्या म्हणंन  सर्वांनाच  पटल  होत.  अर्थात मी नवीनच जॉइन झालेलो असल्यामुळे मला कसला आजार झाला नव्हता, पण कुठेतरी स्ट्रेस जाणवायचा  . पण इतर सर्व सीनियर टीम मेंबर्ज़ ने मात्र आपले प्रॉब्लेम 
Openly share   केले. कॉर्पोरेट लाइफ आणि- पर्सनल लाइफ मधे  सर्व बेजार झाल्यासारखे वाटत होते.

“म्हणजे “ईविल फोर्सस” आहेत तर.” प्रथमेश ने हसून विचारल .” ओके . म्हणजे OD  ची गरज आहे. तर
 आता आपण तिसऱ्या  पॉइण्ट कडे जावूयात.".


सी) Then we find out those factors, which are necessary for OD-.- ह्यात ते फॅक्टर्स असणार  जे “ईविल फोर्सस” ला मिनिमाइज़ करणार आणि  “Positive Forces ” ला वाढवणार. ह्यामधे आपले  Human Assets म्हणजे आपली हे टीम एक पॉज़िटिव फोर्स आहे. आपल्या बाकीच्या कॉन्सेप्ट पण ज्या पुढे यतीलच त्या पॉज़िटिव फोर्स असणार आहेत.

द) Considering above two, we establish an OD system to make the oragnisation more efficient. जसा श्री कृष्णाच्या “अवतार” घेतल्याने धर्माला नवसंजीवनी प्राप्त झाली, तसाच आपली ही टीम आणि “आल्टरनेट पॅरडाइम” चा वापर करून ऑड ची एक नवीन सिस्टम तयार करू शकतो जी, आपल्यात कॉन्फिडेन्स, बिलीफ निर्माण करेल आणि अमेरिकेत आपल्या कंपनीला sustain  करून Nourishment करेल."

"आता ही slide पहा।  ह्यातून तुम्हाला नीट समजेल. "



(To be continued...)





"Alternate Paradigm" # 5

(Continue from alternate paradigm # 4)


दुसर्‍या दिवशी प्रथमेश लंच नंतर आला. मी तर सकाळपासून त्याची वाट पाहत होतो. सकाळीच त्याला “Congrats” चा message ही  केला होता. 2.30 वाजता आमची नवीन टीम ट्रेनिंगहॉल मधे जमली. आता आमची टीम अशी होती- 

1. कर्णिक सर (टीम लीडर.)
2. श्री. पवार ( आमच्या अकुर्डी प्लँट चे Production हेड.)
3. श्री. जोशी ( पवार सरांचे असिस्टेंट.)
4. श्री. प्रथमेश ( OD  हेड)
5. श्री. माधव महाजन ( फाइनान्स डिपार्टमेंट, मुंबई ऑफीस )
6. श्री. मेहता ( माधव सरांचे असिस्टेंट)
7. चौधरी मॅडम (मुंबई च्या QC डिपार्टमेंट मधून)
8. मिस. कल्याणी ( चौधरी मॅम च्या असिस्टेंट.)
9. मिस. इरावती
10. श्री. आशुतोष (आमच्या Head Office चे मार्केटिंग एग्ज़िक्युटिव.)
11. अन् , मी स्वत:

म्हणजे साधारणपणे प्रत्येक डिपार्टमेंट मधले दोघेजण घेऊन एक टीम तयार करण्यात आली होती.

महाजन सरांचा एक प्रश्न होता.- “म्हणजे आपण आतापर्यंत जे मॅनेज्मेंट वापरात होतो, ते वापरणं पूर्णपणे बंद करायचं?”

“नाही.” प्रथमेशने उत्तर दिल. “ कारण मॅनेज्मेंट च्या बेसिक कॉन्सेप्ट कुठेही गेलं, तरी सारख्याच राहणार. आपण ते बदलणार नाही, तर त्या कॉन्सेप्ट एका भारतीय अप्रोचने इंप्लिमेंट करणार.”
“म्हणजे कसं?” हा प्रश्न QC च्या चौधरीमॅडमचा होता.
“म्हणजे, आपण आता मॅनेज्मेंट मधे, Leadership, Decision Making, Goal Settin, Motivation,  अशा कॉन्सेप्ट वापरतो. ह्या कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी, इंप्लिमेंट करण्यासाठी आपण “आल्टरनेट पॅरडाइम” ही थियरी वापरणार आहोत.
“माझा अजुन एक प्रश्न आहे, की, आपण फक्त भग्वद गीताच फॉलो करणार आहोत का आजुन काही ऑप्षन आहे.” चौधरी मॅडम चा दुसरा प्रश्न.
“To be Honest, माझा रिसर्च सध्या फक्त भग्वद गीता आणि स्वामी विवेकानंद ह्यांचे थॉट्स इतकाच लिमीटेड आहे. पण मला ह्यात इतर धर्मांच्या ग्रंथाचा पण अभ्यास करायचा आहे.” प्रथमेशने सांगितल.
“पण गीतेत डाइरेक्ट्ली मॅनेज्मेंट च्या कॉन्सेप्ट दिलेल्या आहेत?” हा प्रश्न चक्क इरावतीने विचारला होता.
“डाइरेक्ट नाही. कारण गीतेचा मूळ उद्देश हा धार्मिक गोष्टींचा प्रसार करण्याचा आहे. पण आपण सहजपणे गीतेच्या श्लोकातून, मूळ धार्मीक विचारांन्ना कुठेही हर्ट न करता, गीतेचं आणि इतर धर्म ग्रन्थान्चं योग्य ते पावित्र्य राखून, मॅनेज्मेंट शिकू शकतो.  अन् स्वामी विवेकानंदानचे थॉट्स तर बरेचसे मॅनेज्मेंटशी डाइरेक्ट रिलेटेड आहेत.” प्रथमेशने स्पष्टीकरण दिलं.  
“आपली प्रोसेस काय असणार आहे?” मीही एक प्रश्न विचारला.
“आजपर्यंत आपण Western management authorsला रेफर करून मॅनेज्मेंट च्या कॉन्सेप्ट समजून घेत होतो आणि इंप्लिमेंट करत होतो.  आता हेच आपण “आल्टरनेट पॅरडाइम” च्या माध्यमातून करणार आहोत. We are not going to learn new management, but we are going to learn new approach to accept and to implement the management"
“ok. पण आपण सुरूवात कशी करणार आहोत?” कर्निक सरानी विचारल.

“We are starting with new Dharma and New GOD." आम्हाला भयंकर आश्‍चर्यात टाकत प्रथमेश म्हणाला.

"Alternate Paradigm"# 4


आयुष्यात समोर काय वाढून ठेवलेल असत हे आपल्याला कधीच समजत नाही. आता हेच बघाना... मला अमेरिकेला जातआहे, हे अचानक मला समजलं. त्याच असं झालं की, ऑफीसमध्ये 2,3,दिवस नुसती गडबड चालू होती. सर्वांच्या चेह-यावर फुल्ल Tension  ..  अचानक एक दिवस गोडबोले सरांनी मला, ईरावातीला, एक marketing executive-  आशुतोष, आम्हाला लंचनंतर ट्रेनिंग हॉल मधेजमायला संगितल. लंचमधे मी पाहील की, आमच्या ईतर प्लॅंट्समधून पण काहीजण आले होते, जे आम्हाला लंचनंतर ट्रेनिंग हॉलमधे जॉइन झाले.
 बरोबर 2.30 वाजता कर्णीक सर, गोडबोले सर, आणि प्रथमेश ट्रेनिंग हॉलमधे आले. 
कर्णिक सर बोलायला ऊभे राहीले. त्यानी आम्हाला आत्ता जे सांगितल, ते कंपनीच्या दृष्टीने नक्कीच चांगल नव्हतं. आमचं ज्या अमेरिकन कंपनीबरोबर tie-up  होणार होतं, त्यानी काहीतरी कारण सांगून withdraw केलं होतं. गेले 2,3 दिवस त्याबद्दलच मीटिंग्स चालू होती. आम्हाला, ज्याना आत्ता बोलवलहोत, त्याना एक नवीन जबाबदारी देण्यात येणार होती. जर आम्ही सर्व तयार असलो तर, कंपनी अमेरिकेत आपला नवा प्लँट सुरू करणार होती. पण प्रश्न इतकाच नव्हता, तर अमेरिकेत जाऊन, तिथे शून्यापासून सगळ करायच होत. त्यासाठीच आमची ही टीम करण्यात आली होती. आता आम्हाला ठरवायच होत की आम्ही ही मोठी जबाबदारी घ्यायला तयार आहोत की नाही? कर्णीक सर स्वत: आमची टीम लीड करणार होते. गोडबोले सर इथेच राहून हेड-ऑफीस सांभाळणार होते. सगळ्यांनी लगेच होकार दिला. (अमेरिकेला जायला मिळ्नार म्हणून बहुतेक, कारण मी त्यामुळेच हो सांगितल होत. माझ लॉजिक फार चालत.)

सर्वांचा होकार आल्यानंतर कर्णिक सरांनी प्रथमेशची ओळख इतर नवीन लोकांना करून दिली. 

 पण आमच्या ह्या नवीन टीम मधले जे नवीन मेंबर होते, त्यानी प्रथमेश कशासाठी हवा? असा प्रश्न ठेवला. त्यांच म्हणंन होतं की, आपण जर अमेरिकेत जाणार आहोत, तर तिथे अशा ‘नवख्या’ ट्रेनर च्या ऐवजी, एखाद्या एक्सपीरियेन्स्ड ट्रेणार ला घेऊन जाव. 
त्यांच म्हणन पण बरोबर होत. कारण आम्ही “अमेरिकेत” जाणार होतो, अन् अशावेळी तिथल्या कॉर्पोरेट कल्चरला मॅच होणार आपल मॅनेज्मेंट हव अस त्यांच म्हणंन पडलं. अस “भारतीय” मॅनेज्मेंट तिथे टिकूच शकणार नाही, अस त्यांना वाटत होत.  तिथे जाऊन स्वत:च "हसं "करण्यापेक्षा न गेलेलचचांगल होईल अस ही त्यांनी सुचवल. मघाशी अमेरिकेत जाण्याच्या कल्पनेने आम्ही खुश झालो होतो, पण आता, नकळत सगळ्यांच्या मनावर ताण आला होता.

मी प्रथमेशकडे पाहीलं, पण त्याला ह्याचा काहीच ताण नसल्याच जाणवल मला. तो आपला मस्त आरामात बसून प्रत्येकाच ऐकत होता. म्हणजे असा विरोध होईल, हे त्याने गृहीतच धरलेल असणार. ह्यावर कर्निक सरांनी प्रथमेशला त्याच म्हणंन मांडायला सांगितल...

सर्व आता प्रथमेशकडेच बघत होते. त्याने नेहमीप्रमाणे प्रसन्न हसून बोलायला सुरूवात केली
.“दुसर्‍या वर्ल्ड- वॉर मधली एक घटना सर्वानां माहिती आहेच, ती म्हणजे जपानवर टाकण्यात आलेला न्यूक्लियर बॉम्ब. जपान ह्यात ऑलमोस्ट बेचिराख झाला होता.( डाइरेक्ट विषय न काढता, सुरूवात काहीतरी वेगळी करायची प्रथमेशची सवय मला समजली होती.)  त्यामुळे अमेरिकेने डेमिंग आणि जुरान ह्या दोन Management Experts ला जपान ला पाठवल, जपानची सर्वच बाबतीत, Especially,  मॅन्यूफॅक्चरिंग फील्ड मधे मदत करण्यासाठी. साधारणत: पहिली काही वर्ष जपानी लोकांनी सर्व शिकून घेतल, पण साधारणत: 10-12 वर्षानी डेमिंग आणि जुरानच्या लक्ष्यात आल की, जपान आपल्या एक्सपेक्टेशन पेक्षा खूपच पुढे गेला आहे. त्यानी  ह्या मागच रीज़न शोधल अं ते होत- Kaizen, एक Japanese फिलासॉफी, ज्याचा उपयोग करून जॅपनीज इंडस्ट्री युरोप आणि अमेरिकेच्या पण पुढे निघाली होती.Kaizen  ही फिलासॉफी त्यांच्या संस्कृतीचाच एक भाग आहे, जो त्यानी  एजुकेशन,  हेल्थकेअर, मॅन्यूफॅक्चरिंग, पब्लिक सर्वीसज़, ह्यासर्व ठिकाणी वापरली आहे, अन् त्याचा झालेला चांगला परिणाम आपण आपल्या डोळ्यांनी  पाहताच आहोत. 

आपली कंपनी  पण आता फॉरिन मार्केट मधे जात आहे, ज्यांच्या बरोबर आपल Tie-up होणार होत, ते आता तयार नाहीयेत. अशा परिस्थितीत आता आपल्यालाच  सर्व मॅनेज करायचाय.  कर्निकसरांचा आग्रह आहे की, आपण फॉरिन मार्केट मधे जाताना काही तरी “भारतीय” घेऊन जावं. जपानी लोकासारखी जगाला एक देणगी द्यावी. आपली ही “भारतीय” मॅनेज्मेंट ची फिलासॉफी, ही आपली ओळख बनावी, हा एक “Brand” बनावा. एक असा मॅनेज्मेंट अप्रोच जो आपला स्वत:चा असेल, आपल्या भारताच्या मातीतला, जो आपल्या Genes मधे पिढ्यान-पिढ्या रुजलेला आहे.” 
   
प्रथमेशने आपलं बोलणं पुढे चालू ठेवलं- “मला माहिती आहे,हे सर्व तुम्हाला नवीन वाटतयं .आक्सेप्ट करायला पण अवघड जाईल. कारण “ भारतीय धर्म, संकल्पना,आणि विचार”, हे आउटडेटेड आहेत,बुरसटलेले आहेत, असा आपलाच गैरसमज झालाय. इम्पोर्टेड तेवढाच चांगल ह्यावर आपल इतका विश्वास बसलाय की, आपण आन्धळेपनाने वेस्टर्न कल्चर फॉलो करतोय. एक लक्ष्यात घ्या की, मी वेस्टर्न कल्चर किंवा वेस्टर्न मॅनेज्मेंटला ‘वाईट’ म्हणत नाहीए, तर माझा emphasis  आपल्या कल्चर वर जास्त आहे. ते जास्त ‘चांगल’ आहे हे माझ मत आहे. आपणच आपल्या कल्चर कडे डोळे-झाक केल्यामुळे, आज आपल्याला अमेरिकन लोक आयुर्वेदाचे  गुणधर्म सांगत आहेत, योगासने शिकवत आहेत. आता आपण, ह्या भारताने जगाला “ज्ञान” देण्याची आवश्यकता आहे.  जे जपान सारख्या बेचिराख झालेल्या देशाला जमल, ते आपल्या महान देशाला नक्कीच जमणार, असा मला विश्वास आहे. कारण Tie-up कॅन्सल झाल्यामुळे तुम्ही निराश न होता, मोठ्या उमेदीने अमेरिकेत जायला होकार दिलात, म्हणजेच आपल्या ह्या टीम मधे नक्कीच चांगल करून दाखवायचे गट्स आहेत. आपल्या टीमच हे नवीन  “भारतीय मॅनेज्मेंट” नक्कीच संपूर्ण जगाला एक देणगी ठरणार. ”  प्रथमेशने बोलणं थांबवल, तसं सर्वांनी टाळ्या वाजवल्या. ह्याच अर्थ सर्वांना त्याच म्हननं पटलं होत. मी तर एकदम फॅन झालो होतो त्याचा. कर्निक सर पण कौतुकाने त्याच्याकडे पाहत होते.



आता आमच्यात पण ह्या भारतीय मॅनेज्मेंट बद्दल उत्स्साह निर्माण झाला होता. 
नक्कीच, आम्ही सर्व प्रथमेशच्या बोलण्याने कन्विन्स झालो होतो. आम्हाला मनापासूनआता आपल भारतीय मॅनेज्मेंट असाव, असं वाटत होत. आज पर्यंत आपण दुसर्‍याकडून मिळालेल्या ज्ञानावर जगतं होतो, पण आज आम्हाला संपूर्ण जगासमोर आपल्या भारताची महानता नेऊन ठेवायची संधी होती.  वर्ल्ड कप जिंकल्यावर मला जसं वाटलं होत, तसाच Feel  आताही होत होता.. आमची पूर्ण टीम super-excited  होऊन उद्याच्या ट्रेनिंग ची वाट पाहत होती...

Tuesday, 4 November 2014

Alternate Paradigm # 3


Alternate Paradigm # 3

continue.... ( From Alternate paradigm # 2)

अचानक सर्वजन माझ्याकडे पाहू लागले. कर्णिक सर पण उठून उभे राहीले.
कर्णिक सराना अस अचानक उभराहिलेले पाहून मला माझ काही चुकल तर नाही ना? अस वाटल.

सर्वानी माझ्याकडे अस पाहायाच कारण म्हणजे, मी अचानक विचारलेला प्रश्न- "Can you please elaborate your concept to me?"

ह्यावर प्रथमेश ने काही उत्तर द्यायच्या आधीच कर्णिक सर म्हणाले- प्रथमेश नक्कीच सर्वांच्या प्रश्नाच उत्तर देईल, पण आता आम्हाला एक दुसरी  मीटिंग आहे, त्यामूळे  आपल्याला  इथेच थांबाव लागणार आहे.आपण आजच लेक्चर ऊद्या कण्टीन्यू  करूयात. ''  

"यस. आपण उद्या ह्यावर  नक्कीच  बोलूत.  इनफॅक्ट, प्रॉपर ट्रेनिंगच चालू  करूयात.  पण With kind permission from Karnik sir, , मला  आणखी एक Example द्यायाच आहे."        

कर्णीकसरांकडे पाहून, त्यांची परवानगी घेऊन, प्रथमेशने एक प्रश्न विचारला -  " भग्वद गीता सर्वानामाहिती आहेच.तर आपल्या कडे गीता कधी वाचली किंवाअभ्यासली जाते? " 
" कधी म्हणजे?  गीता हा आपला पवित्र अन् धार्मिक ग्रंथ आहे. हा ग्रंथ देवळात किंवा साधारणपणे रिटाइयर्मेंट नंतर आपल्याकडे वाचला जातो."   गोड्बोले सरानी उत्तर दिल. पण  त्यांना हा  प्रश्न  अगदीच  'फालतू'  वाटल्याच दिसत होत.

         " Exactly ! मला हेच सांगायाच  आहे. भग्वद गीता हा  ग्रंथ श्री कृष्णाने, अर्जुनाला सांगितला. पण कोणत्या परिस्थितीत? तर जेव्हा युद्ध चालू होणार होत, अन् अर्जुन हताशपणे बसून युद्ध टाळायला बघत होता.श्री कृष्णाने गीता सांगून अर्जुनाला युद्ध करायला, म्हणजेच 'कर्म' करायला मोटीवेट केल.
      .म्हणजेच "Alternate Paradigm"च्या कॉन्सेप्ट प्रमाणे, गीता हा ग्रंथ उतार-वयात वाचायचा नसून, तो आपल्या उमेदीच्या काळात वाचायला हवा.म्हणजे आपण  जेव्हा''कर्म''  करायला  लागतो, तेव्हाच. माझ तर म्हणंन आहे की, वयाच्या 15-16 व्या वर्षांपासूनच हा ग्रंथ, जो "कर्मयोग" सांगतो, अभ्यासाला गेला पाहिजे. खरोखरची " Personality Development" ह्यातूनच होईल. कारण ह्या वयातच ''जग" आपल्या समोर ऊभ असत,  कुरुक्षेत्रच्यायुद्धा सारख्या  परिस्थितीला तोन्ड द्यायची वेळ येऊ शकते. अशा वेळी ,  "यंग्स्टर्स किंवा यूथ"ला  मार्गदर्शन करण्याच काम गीता करेल. " प्रथमेश  उत्साहित  होऊन त्याच्या थियरी ची कॉन्सेप्ट सांगत होता.


         ह्यावर गोड्बोले सरांना अजुन बोलायच होत पण  कर्णिक सरानी मीटिन्गची आठवण करून देताच, तो विषय तिथेच थांबला. प्रथमेश आणि आम्ही सर्व जुनिअर्स  हॉल मधून बाहेर पडलो. बरेचसे सीनीयर्स अन् कर्णिकसर मात्र हॉल मधेच थांबले, मीटिन्ग साठी.  

          उरलेला तास आम्ही आमच्या रेग्युलर कामात घालवला. ज्यानी टेली-कॉलिंगच काम केलेल आहे, त्यानाहे माहितीच असेल की, फोनवर कस्टमरच्या अपोईण्टमेन्ट घेण किंवा सर्वे करण, हे फारच त्रासदायक असत. एक तर कोणी नीट बोलत नाही, अन् त्यात  एखाद्या कंपनीचा फोन आहे म्ह्न्टल तर कस्टमरच्या कपाळावरच्या 'आठ्या" फोन वरुन ही स्पष्ट दिसतात. मी नवीनच जॉइन झालेलो असल्यामुळेमाझ्याकडे फक्त 'फोन- कॉलिंग"च काम होत. जे ज्युनियर सेल्स-पर्सन होते त्यानामात्र क्लाइंट बरोबर डायरेक्ट डील कराव लागायाच.


ऑफीसमधून घरी जाईपर्यन्त प्रथमेशने मान्डलेली थीम डोक्यात घोळत होती.  त्याची "आत्म्याची" थेअरी मला नीट क्लियर नव्हती झाली. पण गीता लहानपणापासूनच अभ्यासली गेली पाहिजे, हे पटलहोत.पण जस घरी पोहोचलो तस नेहमीप्रमाणे त्व समोर बसलो. ह्या तमाम ''आई" मंडळीना आपला मुलगा त्व समोर शान्तपणे बसलेला बघवत नाही. त्यांच आपलचालूच असत, 'अरेहात-पाय धू अगोदर, ती बॅग अशी का फेकलीस?, कपडे तरी चेंज करायचे होतेस ,इत्यादी, इत्यादी.' 


           काही वेळाने सुहास चा कॉल आला.सुहास हा माझा शाळेपासुनचा मित्र. त्याच BBA झाल होत अन् सध्या 2-3 वर्ष तो फक्त CSवर "कॉन्सेंट्रेट" करणार होता. आम्ही नेहमीच्या कट्ट्यावर बाकीच्याना भेटायला जाणार होतो, अन् त्यासाठी तो मला घ्यायला येणार होता. आम्ही सर्वजण खाण्याच्या बाबतीत अगदी खवय्ये होतो ... मी लगेच सगळ्याना भेटायचा प्लान वॉट'स अप केला. पण एकजण वेळेवर आला तर शप्पथ. बर झाल, येताना मी आणि सुहास ने ऊस्मान चे भजे-पाव पोटात सारले होते. बाकीचे येईपर्यंत आम्ही निराला बाजार '' न्याहाळात'' बसलो. काही "दिसल" की, सुहास " गुदगुल्या"  झाल्यासारख हलत होता. हळूहळू एकेकजण जमला. थोड्या वेळ "ईकडे- तिकडे" बघत आम्ही पिक्चरचा प्लॅन ठरवला. पुढच, सगळ नेहमीप्रमाणेच, बाहेर जेवण आणि रात्री घरी जाण. लाइफ यापेक्षा चांगली असूच शकत नाही. अस माझ प्रामणिक मत होत. उद्या सकळी परत होतच नेहमीच रुटीन.

...to be continue...




Saturday, 1 November 2014

Alternate Paradigm # 2

Alternate Paradigm # 2

continued...
काय संबंध भारताच्या संस्कृती चा आणि OD चा??? हा माणूस वाट्टेल ते बोलतोय अंन् आम्ही त्याला ट्रेनर मानून ऐकून घ्यायच? बाकींच्या चेहा-यावर पण हेच प्रश्नचिन्ह होत….
पण जस त्याने बोलण पुढे चालू ठेवल,, तस मला हे काहीतरी वेगळ असल्याची जाणीव झाली. मी माझ्या नकळत त्याला रेस्पेक्ट करू लागलो होतो. त्याने मांडलेले विचार, ज्याना तो “आल्टर्नेटिव पॅरडाइम” म्हणत होता, ते खरच नवीन अन् वॅल्युवबल वाटले मला. त्यांच बोलन आता मी नीट ऐकू लागलो…



“आपल्या हजारो वर्ष जुन्या ह्या देशात प्रत्येक गोष्ट उपलब्ध आहे, निसर्ग समृद्धी आहे, ह्यूमन रीसोर्स आहे, ऑपर्चुनिटीस आहेत.  वेगवेगळे धर्म आहेत, योगा आहे, आयुर्वेद आहे.”…  
“एक अस ज्ञानआहे, जे आपल्या या देशाला, आपल्याला महान, समृध्द आणि भव्य बनवू शकत. 
गरज आहे ती हे ज्ञान नव्या दृष्टीकोनातून पाहायची.
           “ तुम्हाला वाटात असेल, हा प्रथमेश नेमक काय बोलतोय? OD आणि ह्याचा काय संबंध आहे? वेल, त्या अगोदर मी माझ कार्यक्षेत्र सांगतो. काही दिवसापूर्वी माझी अन् कर्णिक सरांची भेट झाली होती. मी त्यांचाकडे फाइनान्षियल मदतीसाठी गेलो होतो.  माझ्या R & D फील्ड मधे फंड्स मिळावेत म्हणून.माझ्या R & D चा विषय आहे- The Indian Epics and Human Life. 
              ज्यात मी धर्मग्रंथात सांगितली गेलेली तत्व ह्यांचा ह्यूमन लाइफसाठी होऊ शकणारा उपयोग ह्यावर काम करत आहे. आता ह्यूमन लाइफचा अर्थ मी जरा स्पेसिफिक ठेवलाय, तो म्हणजे ह्यूमन लाइफ इन ऑर्गनाइज़ेशन. ज्याला मॉडर्न भाषेत HRM म्हणतात. मी जेव्हा आपले धर्मग्रंथ अभ्यासले, तेव्हा माझ्या अस लक्ष्यात आल की, त्यातली तत्व ही फक्त पूजा, कर्मकांड किवा एखाद्या पन्था पुरती मर्यादित नसून, ही तत्व संपूर्ण मानवी आयुष्य, समाज, शासन, ऑर्गनाइज़ेशन ह्याना पण लागू आहेत. प्रत्येक प्रश्नाच उत्तर अगोदरच उपलब्ध आहे,. गरज आहे ती फक्त “Alternate Paradigm” ची”.


             “ एखाद example द्यायच झाल तर, - Law of Conservation of Energy सांगतो की- ‘The law of conservation of energy is a law of science that states that energy cannot be created or destroyed, but only changed from one form into another or transferred from one object to another.  आता आपल्या तत्वज्ञानात हे अगोदरच सांगीतल गेलेले आहे. तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल ह्याबद्दल?”
प्रथमेशच्या अनपेक्षित प्रश्नाने सर्वजण विचारात पडले. कर्णिक सर मात्र अगोदरच उत्तर माहिती असल्याप्रमाणे आमच्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होते. अगोदरच आम्ही सर्वजन धर्म अन् मॅनेज्मेंटच रीलेशन असत हे ऐकून चक्रावलो होतोच, त्यात, साइन्सचा हा लॉ आपल्याला अगोदरच सांगण्यात आलेला आहे, हे ऐकून डोक Hang झाल होत माझ. Peon ने नेमका आणलेला चहा सर्वांच Energy Booster ठरला.  ह्या टी- ब्रेकमुळे प्रथमेशच Interaction थोडा वेळ थांबल.
 
ईतर ट्रेनिंग-सेशन मधेपण असा चहा आला की, सर्वाना “सुटलो बुवा, काही वेळा साठी ह्या ट्रेनिंग मधून’अशा अर्थाच्या चर्चा व्हायच्या.पण आज सर्वजन टी- ब्रेक मधे पण प्रथमेशच्या बोलण्यावर गंभीरपणे चर्चा करत होते. सर्वाना उत्तर जाणून घ्यायची इतकी ईच्छा होती की, टी- ब्रेक चालू असतानाच, एका सीनियरने, मि.गोडबोल्यानी प्रथमेशलाच उत्तर द्यायला संगितल. मि. गोडबोले, हे नावाला जागनारे होते. समोर गोड बोलणारे अन् मागे गॉसिपिंग करणार. तेच गोडबोले आज स्वत:हून विचारात होते म्हणजे, सर्वाना प्रथमेशच्या बोलण्यात इंट्रेस्ट असल्याच लक्ष्यातयेत होत. माझी पण condition  फारशी वेगळी नव्हती.
“बर सांगतो.” परत एकदा प्रसन्न हसूनप्रथमेशने सुरूवात केली. “ आपण सर्व ह्याच उत्तर अगदी लहानपण पासून ऐकत आलोय.  नैन छिन`दती शस्राणि नैन दहाती पावक : आणि 2.22  क्रमांकाचा भगवद गीतेतला श्लोक  … हे आत्म्याच वर्णन म्हणजेच माझ्या स्टडी प्रमाणे कुठेतरी लॉ ऑफ एनर्जी ला कनेक्टेड आहे.  (सगळ्याबरोबरमाझ्या पण तोंडातून “काय?” असा प्रश्न बाहेर पडला.)माझा ह्यावर अजुन रिसर्च चालू आहे.  मी मघाशी वापरलेला शब्द “ आल्टरनेट पॅरडाइम” हेच सजेस्ट करतो. कस ते एक्सप्लेन करतो. आपल्यात, एखाद्या शरीरात आत्मा असण हेच जिवंतपणाच लक्षण मानल जात.  जर आत्मा नसेल तर त्या जीवाला- निर्जीव मानला जातो. जस एखाद मशीन, एनर्जी शिवाय चालू शकणार नाही, अगदी तसच. जस आत्म्याला नष्ट करता येत नाही, तसच एनर्जी पण नष्ट होऊ शकत नाही. फक्त एका फॉर्म मधून दुसा-या फॉर्म मधे रुपांतरीत होते. म्हणजेच  आत्मा ची थियरी आजच्या मॉडर्न साइन्स मधे एनर्जी च्या रूपात मांडली गेलेली आहे, अस माझ “आल्टरनेट पॅरडाइम” सांगत.”
अशाच प्रकारे माझी  स्टडीचालू आहे ज्यात मी फक्त हिंदू संस्कृतीच नाही तर, बाइबल, क़ुअरान, बुद्धीझम ह्यांचा ही अभ्यास करणार आहे. अंन् हे सर्व करण्यासाठी मला फंड्स ची आवश्यकता आहे.
मि. कर्णिक ह्यांच्याकडे मी जेव्हा फंडिंग साठी गेलो होते, तेव्हा आमची ह्या विषयावर बरीच चर्चा झाली होती. त्यानी मला फंड्स द्यायला लगेच होकार दिला. पण मला अस डायरेक्ट मदत घेण आवडणार नव्हत, म्हणून मीच त्याना सजेस्ट केल की,  मी तुमच्या कंपनीच्या कामात काही मदत करू शकलो तर मला आनंदच होईल. Thanks to कर्णिक सर ज्यानी माझ्या विनंतीला मान देऊन हा जॉब मला ऑफर केला.

अचानक सर्वजन माझ्याकडे पाहू लागले. कर्णिक सर पण उठून उभे राहीले.
कर्णिक सरांना अस अचानक उभ राहिलेल पाहून मला माझ काही चुकलM तर नाही ना? अस वाटल.

...to be Continued... 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( This writng is not intended to hurt or criticize any of Great Epics or Dharma.)
Reference ;-
1. Bhagvad Gita. 2. Gita Rahasya ( Lokmany Tilak) 3. Various Science,  Management, Behaviour books.

Friday, 31 October 2014

Alternate Paradigm # 1


Alternate Paradigm # 1


आजचा दिवस …
सकाळी नेहमी प्रमाणे जाग आली. अलार्म न लावता ही ५.३० ला उठलो आहे ,ह्याची खात्री करून घेतली. काही दिवसापूर्वी  अलारम वाजला तरी, घड्याळात किती वाजले हे पहायचो, कशा कडेही संशयाने पाहायची सवयच लागली होती
.कशाचीच खात्री नव्हती. पण आता ''सब- कॉनशीयस् माइंड" वर विश्वास होता.   इतक्या दिवस ‘Transformation ’ बद्दल ऐकून होतो, पण आज, आत्ता तो अनुभवतोय. 
पण काही दिवसापूर्वी हे चित्रा बराच वेगळ होत… प्रथमेश भेटण्याच्या अगोदर. 

काही महिन्यापुर्वी…
         “गिरीश, चहा ठेवू का?’’ आईचा नेमीचा प्रश्न, न चुकता विचारला जाणारा. माझ उत्तर असायच “व्यायाम केल्यावर… पण करू का आज व्यायाम?” व्यायामाची मला फारशी आवड नाहीए, पण 26 व्या वार्षीच पोट सुटू लागल्यावर व्यायाम करावाच लागतो. 
व्यायाम करत असताना ते ऑफीस मधे जाई पर्यंत माझ्या डोक्‍यात आज जॉइन होणार्‍या एका नव्या एंप्लायी बद्दल विचार चालू होता. एक जन “ऑर्गनाइज़ेशनल डेवेलपमेंट” ह्या पोस्ट वर येणार होता. मला जॉइन होऊन साधारण 3 महिनेच झाले होते. Thanks to MBA, ज्यामुळे मला नौकरी मिळाली होती, नाहीतर आजकाल ग्रॅजुयेशन ला कोण विचारात हो? 
      माझा दिवसभर MBA  मधे शिकलेल्या “OD” बद्दल विचार चालू होता. बर्‍याच सीनियर्स च म्हणंन होतकी हे OD म्हणजे एक फॅड आहे. चांगला performance  देतियेकी आपली कंपनी. मग कशाला हव हे OD ? आता परत काही दिवस ट्रेनिंग आणि कंपनीच काम ह्याच शेड्यूल मॅच कराव लागणार. 
     
                दिवसभर ह्यावरच चर्चा चालू होती. जॉइन झाल्या पासून मला एक समजल होत की, ऑफीस मधे गॉसिपिंग साठी कुठलाही विषय चालतो. त्यातल्या त्यात माझ्या, म्हणजे मार्केटिंग डिपार्टमेंट मधे तर विचारायलाच नको. आज येणार्‍या एम्प्लोईची ओळख खुद्द बॉस करून देणार असल्यामुळे तर सर्वानाच कुतूहल होत. माझ्या दोन क्यूबिकल सोडून बसणार्‍या, आणि माझ्या 3 महिने अगोदरच जॉइन झालेल्या,  इरावतीला मात्र काहीच घेंण देण नसल्यासारख वाटत होत. तीच आपल वेगळच काही तरी चालू असायच नेहमी. माझ बारीक लक्ष असायच. तस सगळीकडे असायच लक्ष म्हणा माझ..

Peon दुपारी लंच नंतर निरोप घेऊन आला की सर्वांना ट्रेनिंग हॉल मधे बोलावलाय. म्हणजे OD चा ट्रेनर आला होता तर… आम्ही सर्व जन आपापल्या पोस्ट नुसार तयारी केली, म्हणजे सीनियर्स लॅपटॉप घेऊन तर, माझ्यासारखे जुनियर पेन आणि नोट पॅड घेऊन एकदचे दाखल झालो.  
        मला ट्रेनिंग हॉल ही जागा फार आवडते. छान एसी असतो, समोर स्क्रीन वर ट्रेनिंगप्रोग्रॅम चालू असतो, आपण फार मन लावून समजावून घेतोय अस नुसतदाखवावलागत. बरेचसे ट्रेनिंग प्रोग्रॅम, ट्रेनिंग हॉल मधून बाहेर पडण्याअगोदरच ‘संपतात’.  माझा गेल्या 3 महिन्याचा अनुभव आणि सीनियर्स चा अनेक वर्षाचा अनुभव, तर हेच दाखवत होता. 
               एक गंमत आहे .माहीत नाही, तुम्ही ह्याल काय म्हणाल, पण ट्रेनिंग हॉल मधे एरावाती चा चेहरा नेमका माझ्यासमोर येईल अशी सिट्टिंग अरेंज्मेंट कशी व्हयायची? मी तर ह्याला योगायोग म्हणतो.

             आजही मी एक "चांगली" जागा पाहून बसलो होतो. डोक्यात आजच्या ट्रेनरचा विचार चालू होता. आम्हाला अगोदरच त्याच एक जनरल प्रोफाइल दिलेल होत.म्हणजे त्याच एजुकेशन- म्हणजे MBA, एरिया ऑफ इंट्रेस्ट-R & D in Human Sector, वगैरे वगैरे. म्हणजे नक्कीच 45-50 वयाचा एक माणूस असेल अस माझ लॉजिक होत. 
थोड्या वेळाने आमचा बॉस, मि. कर्णिक आले. ह्या माणसाने मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही हे खोट असल्याच सिद्ध केल होत.  आमची कंपनी चांगली नावाजलेली होती. एका अमेरिकन कंपनी बरोबर आमच टाय-अप होणार होत. बॉस बरोबर एक मुलगा आला होता. फॉर्मल कपडे होते, टाय नव्हता. म्हणजेहा त्या ट्रेनर चा असिस्टेंट दिसतोय, त्याना असिस्ट करण्यासाठी, माझ आजुन एक लॉजिक.
              मि. कर्णिक हे नेहमीच कामावर प्रेम करणारे बॉस आहेत, त्यामुळे जोक्स वगैरे त्याना मानवायाच नाही. पण त्यांच आताच वाक्य ऐकून मला नक्कीच हसायल आल. ईतर कलिग्सची पण यापेक्षा फारशी वेगळी प्रतिक्रिया नव्हती. नक्कीच बॉस आज गंमत करण्याचाय मूड मधे होते. काय तर म्हणे, त्यांच्या बरोबर आलेला मुलगा, हा आमच्यास्टाफ ला ट्रेनिंग देणार होता. मी त्याच नीट निरीक्षण केल, फार तर 2,3 वर्ष वयाने ज्यास्त होता तो माझ्यापेक्षा. आमच शिक्षण ही सारखच होत. हा आम्हाला काय ट्रेनिंग देणार अंन् ते पण ODच? बॉस ने तची ओळख करून दिली- “हे मि. प्रथमेश .आजपासून आपल्याला जॉइन होत आहेत. मला माहिती आहे तुमच्या मनात सध्या काय चालू आहे ह्यानाबघून( बॉस त्याला अरे-तुरे ऐवजी आदरार्थी बोलत होते.) 
मी जेव्हा ह्याना पहिल्यांदा भेटलो, तेव्हा मला पण तुमच्यासारखच वाटल होत. ( नक्कीच बॉस त्याच्या वयाबद्दल बोलत आहेत. बॉसला आमच्या मनातल बरोबर समजल. उगाच नाही ते ‘बॉस’ झालेत- माझे आपले विचार चालूच होते.)अन् दुसरा प्रश्न असा असेल की आपल्याला OD ची काय गरज आहे? वेल, ह्या दोन्ही प्रश्नाची उत्तर तुम्हाला मि. प्रथमेशच देतील. मी त्याना ट्रेनिंग ची सुरूवात करण्याची विनंती करतो.” 

खर सांगतो, सुरवातीला माझ्या मनात त्या प्रथमेश बद्दल काही रेस्पेक्ट वाटला नाही. अंन् त्याच्या बोलन्याने तर नाहीच नाही… हसण मात्र त्याच छान होत. एकदा छानससी हसून, आमच्या सर्वाकडे बघून प्रथमेशने बोलायला सुरूवात केली…


“नमस्कार! 
आपला  भारत देश हा विविधतेने नटलेला, असा परंपरागत देश आहे. अशा परंपरा ज्या वेगवेगळ्या फिलॉसोफी, धर्म, संस्कृती, चालीरिती ह्यातून प्रकट होतात. पण गेल्या काही शतकापासून आपण आपली ही “ओळख” विसरत चाललॉय. किवा, माझ्या मता प्रमाणे, त्याचा योग्य तो अर्थ माहिती नसल्यामुळे, आपली ही ओळख, जी संपूर्ण जगाला एक “देणगी” ठरू  शकते,,नेहमीच दुर्लक्षित राहीलेली आहे.”  …..

 काय संबंध भारताच्या संस्कृती चा आणि OD चा??? हा माणूस वाट्टेल ते बोलतोय अंन् आम्ही त्याला ट्रेनर मानून ऐकून घ्यायच? बाकींच्या चेहा-यावर पण हेच प्रश्नचिन्ह होत….
पण जस त्याने बोलण पुढे चालू ठेवल,, तस मला हे काहीतरी वेगळ असल्याची जाणीव झाली. मी माझ्या नकळत त्याला रेस्पेक्ट करू लागलो होतो. त्याने मांडलेले विचार, ज्याना तो “Alternative Paradigm” म्हणत होता, ते खरच नवीन अन् Valuable वाटले मला. त्यांच बोलन आता मी नीट ऐकू लागलो…


....to be continued...