"Alternate Paradigm" # 5
(Continue from alternate paradigm # 4)
दुसर्या दिवशी प्रथमेश लंच नंतर आला. मी तर सकाळपासून त्याची वाट पाहत होतो. सकाळीच त्याला “Congrats” चा message ही केला होता. 2.30 वाजता आमची नवीन टीम ट्रेनिंगहॉल मधे जमली. आता आमची टीम अशी होती-
1. कर्णिक सर (टीम लीडर.)
2. श्री. पवार ( आमच्या अकुर्डी प्लँट चे Production हेड.)
3. श्री. जोशी ( पवार सरांचे असिस्टेंट.)
4. श्री. प्रथमेश ( OD हेड)
5. श्री. माधव महाजन ( फाइनान्स डिपार्टमेंट, मुंबई ऑफीस )
6. श्री. मेहता ( माधव सरांचे असिस्टेंट)
7. चौधरी मॅडम (मुंबई च्या QC डिपार्टमेंट मधून)
8. मिस. कल्याणी ( चौधरी मॅम च्या असिस्टेंट.)
9. मिस. इरावती
10. श्री. आशुतोष (आमच्या Head Office चे मार्केटिंग एग्ज़िक्युटिव.)
11. अन् , मी स्वत:
म्हणजे साधारणपणे प्रत्येक डिपार्टमेंट मधले दोघेजण घेऊन एक टीम तयार करण्यात आली होती.
महाजन सरांचा एक प्रश्न होता.- “म्हणजे आपण आतापर्यंत जे मॅनेज्मेंट वापरात होतो, ते वापरणं पूर्णपणे बंद करायचं?”
“नाही.” प्रथमेशने उत्तर दिल. “ कारण मॅनेज्मेंट च्या बेसिक कॉन्सेप्ट कुठेही गेलं, तरी सारख्याच राहणार. आपण ते बदलणार नाही, तर त्या कॉन्सेप्ट एका भारतीय अप्रोचने इंप्लिमेंट करणार.”
“म्हणजे कसं?” हा प्रश्न QC च्या चौधरीमॅडमचा होता.
“म्हणजे, आपण आता मॅनेज्मेंट मधे, Leadership, Decision Making, Goal Settin, Motivation, अशा कॉन्सेप्ट वापरतो. ह्या कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी, इंप्लिमेंट करण्यासाठी आपण “आल्टरनेट पॅरडाइम” ही थियरी वापरणार आहोत.
“माझा अजुन एक प्रश्न आहे, की, आपण फक्त भग्वद गीताच फॉलो करणार आहोत का आजुन काही ऑप्षन आहे.” चौधरी मॅडम चा दुसरा प्रश्न.
“To be Honest, माझा रिसर्च सध्या फक्त भग्वद गीता आणि स्वामी विवेकानंद ह्यांचे थॉट्स इतकाच लिमीटेड आहे. पण मला ह्यात इतर धर्मांच्या ग्रंथाचा पण अभ्यास करायचा आहे.” प्रथमेशने सांगितल.
“पण गीतेत डाइरेक्ट्ली मॅनेज्मेंट च्या कॉन्सेप्ट दिलेल्या आहेत?” हा प्रश्न चक्क इरावतीने विचारला होता.
“डाइरेक्ट नाही. कारण गीतेचा मूळ उद्देश हा धार्मिक गोष्टींचा प्रसार करण्याचा आहे. पण आपण सहजपणे गीतेच्या श्लोकातून, मूळ धार्मीक विचारांन्ना कुठेही हर्ट न करता, गीतेचं आणि इतर धर्म ग्रन्थान्चं योग्य ते पावित्र्य राखून, मॅनेज्मेंट शिकू शकतो. अन् स्वामी विवेकानंदानचे थॉट्स तर बरेचसे मॅनेज्मेंटशी डाइरेक्ट रिलेटेड आहेत.” प्रथमेशने स्पष्टीकरण दिलं.
“आपली प्रोसेस काय असणार आहे?” मीही एक प्रश्न विचारला.
“आजपर्यंत आपण Western management authorsला रेफर करून मॅनेज्मेंट च्या कॉन्सेप्ट समजून घेत होतो आणि इंप्लिमेंट करत होतो. आता हेच आपण “आल्टरनेट पॅरडाइम” च्या माध्यमातून करणार आहोत. We are not going to learn new management, but we are going to learn new approach to accept and to implement the management"
“ok. पण आपण सुरूवात कशी करणार आहोत?” कर्निक सरानी विचारल.
“We are starting with new Dharma and New GOD." आम्हाला भयंकर आश्चर्यात टाकत प्रथमेश म्हणाला.
No comments:
Post a Comment