Thursday, 11 December 2014


"Alternate Paradigm"# 4


आयुष्यात समोर काय वाढून ठेवलेल असत हे आपल्याला कधीच समजत नाही. आता हेच बघाना... मला अमेरिकेला जातआहे, हे अचानक मला समजलं. त्याच असं झालं की, ऑफीसमध्ये 2,3,दिवस नुसती गडबड चालू होती. सर्वांच्या चेह-यावर फुल्ल Tension  ..  अचानक एक दिवस गोडबोले सरांनी मला, ईरावातीला, एक marketing executive-  आशुतोष, आम्हाला लंचनंतर ट्रेनिंग हॉल मधेजमायला संगितल. लंचमधे मी पाहील की, आमच्या ईतर प्लॅंट्समधून पण काहीजण आले होते, जे आम्हाला लंचनंतर ट्रेनिंग हॉलमधे जॉइन झाले.
 बरोबर 2.30 वाजता कर्णीक सर, गोडबोले सर, आणि प्रथमेश ट्रेनिंग हॉलमधे आले. 
कर्णिक सर बोलायला ऊभे राहीले. त्यानी आम्हाला आत्ता जे सांगितल, ते कंपनीच्या दृष्टीने नक्कीच चांगल नव्हतं. आमचं ज्या अमेरिकन कंपनीबरोबर tie-up  होणार होतं, त्यानी काहीतरी कारण सांगून withdraw केलं होतं. गेले 2,3 दिवस त्याबद्दलच मीटिंग्स चालू होती. आम्हाला, ज्याना आत्ता बोलवलहोत, त्याना एक नवीन जबाबदारी देण्यात येणार होती. जर आम्ही सर्व तयार असलो तर, कंपनी अमेरिकेत आपला नवा प्लँट सुरू करणार होती. पण प्रश्न इतकाच नव्हता, तर अमेरिकेत जाऊन, तिथे शून्यापासून सगळ करायच होत. त्यासाठीच आमची ही टीम करण्यात आली होती. आता आम्हाला ठरवायच होत की आम्ही ही मोठी जबाबदारी घ्यायला तयार आहोत की नाही? कर्णीक सर स्वत: आमची टीम लीड करणार होते. गोडबोले सर इथेच राहून हेड-ऑफीस सांभाळणार होते. सगळ्यांनी लगेच होकार दिला. (अमेरिकेला जायला मिळ्नार म्हणून बहुतेक, कारण मी त्यामुळेच हो सांगितल होत. माझ लॉजिक फार चालत.)

सर्वांचा होकार आल्यानंतर कर्णिक सरांनी प्रथमेशची ओळख इतर नवीन लोकांना करून दिली. 

 पण आमच्या ह्या नवीन टीम मधले जे नवीन मेंबर होते, त्यानी प्रथमेश कशासाठी हवा? असा प्रश्न ठेवला. त्यांच म्हणंन होतं की, आपण जर अमेरिकेत जाणार आहोत, तर तिथे अशा ‘नवख्या’ ट्रेनर च्या ऐवजी, एखाद्या एक्सपीरियेन्स्ड ट्रेणार ला घेऊन जाव. 
त्यांच म्हणन पण बरोबर होत. कारण आम्ही “अमेरिकेत” जाणार होतो, अन् अशावेळी तिथल्या कॉर्पोरेट कल्चरला मॅच होणार आपल मॅनेज्मेंट हव अस त्यांच म्हणंन पडलं. अस “भारतीय” मॅनेज्मेंट तिथे टिकूच शकणार नाही, अस त्यांना वाटत होत.  तिथे जाऊन स्वत:च "हसं "करण्यापेक्षा न गेलेलचचांगल होईल अस ही त्यांनी सुचवल. मघाशी अमेरिकेत जाण्याच्या कल्पनेने आम्ही खुश झालो होतो, पण आता, नकळत सगळ्यांच्या मनावर ताण आला होता.

मी प्रथमेशकडे पाहीलं, पण त्याला ह्याचा काहीच ताण नसल्याच जाणवल मला. तो आपला मस्त आरामात बसून प्रत्येकाच ऐकत होता. म्हणजे असा विरोध होईल, हे त्याने गृहीतच धरलेल असणार. ह्यावर कर्निक सरांनी प्रथमेशला त्याच म्हणंन मांडायला सांगितल...

सर्व आता प्रथमेशकडेच बघत होते. त्याने नेहमीप्रमाणे प्रसन्न हसून बोलायला सुरूवात केली
.“दुसर्‍या वर्ल्ड- वॉर मधली एक घटना सर्वानां माहिती आहेच, ती म्हणजे जपानवर टाकण्यात आलेला न्यूक्लियर बॉम्ब. जपान ह्यात ऑलमोस्ट बेचिराख झाला होता.( डाइरेक्ट विषय न काढता, सुरूवात काहीतरी वेगळी करायची प्रथमेशची सवय मला समजली होती.)  त्यामुळे अमेरिकेने डेमिंग आणि जुरान ह्या दोन Management Experts ला जपान ला पाठवल, जपानची सर्वच बाबतीत, Especially,  मॅन्यूफॅक्चरिंग फील्ड मधे मदत करण्यासाठी. साधारणत: पहिली काही वर्ष जपानी लोकांनी सर्व शिकून घेतल, पण साधारणत: 10-12 वर्षानी डेमिंग आणि जुरानच्या लक्ष्यात आल की, जपान आपल्या एक्सपेक्टेशन पेक्षा खूपच पुढे गेला आहे. त्यानी  ह्या मागच रीज़न शोधल अं ते होत- Kaizen, एक Japanese फिलासॉफी, ज्याचा उपयोग करून जॅपनीज इंडस्ट्री युरोप आणि अमेरिकेच्या पण पुढे निघाली होती.Kaizen  ही फिलासॉफी त्यांच्या संस्कृतीचाच एक भाग आहे, जो त्यानी  एजुकेशन,  हेल्थकेअर, मॅन्यूफॅक्चरिंग, पब्लिक सर्वीसज़, ह्यासर्व ठिकाणी वापरली आहे, अन् त्याचा झालेला चांगला परिणाम आपण आपल्या डोळ्यांनी  पाहताच आहोत. 

आपली कंपनी  पण आता फॉरिन मार्केट मधे जात आहे, ज्यांच्या बरोबर आपल Tie-up होणार होत, ते आता तयार नाहीयेत. अशा परिस्थितीत आता आपल्यालाच  सर्व मॅनेज करायचाय.  कर्निकसरांचा आग्रह आहे की, आपण फॉरिन मार्केट मधे जाताना काही तरी “भारतीय” घेऊन जावं. जपानी लोकासारखी जगाला एक देणगी द्यावी. आपली ही “भारतीय” मॅनेज्मेंट ची फिलासॉफी, ही आपली ओळख बनावी, हा एक “Brand” बनावा. एक असा मॅनेज्मेंट अप्रोच जो आपला स्वत:चा असेल, आपल्या भारताच्या मातीतला, जो आपल्या Genes मधे पिढ्यान-पिढ्या रुजलेला आहे.” 
   
प्रथमेशने आपलं बोलणं पुढे चालू ठेवलं- “मला माहिती आहे,हे सर्व तुम्हाला नवीन वाटतयं .आक्सेप्ट करायला पण अवघड जाईल. कारण “ भारतीय धर्म, संकल्पना,आणि विचार”, हे आउटडेटेड आहेत,बुरसटलेले आहेत, असा आपलाच गैरसमज झालाय. इम्पोर्टेड तेवढाच चांगल ह्यावर आपल इतका विश्वास बसलाय की, आपण आन्धळेपनाने वेस्टर्न कल्चर फॉलो करतोय. एक लक्ष्यात घ्या की, मी वेस्टर्न कल्चर किंवा वेस्टर्न मॅनेज्मेंटला ‘वाईट’ म्हणत नाहीए, तर माझा emphasis  आपल्या कल्चर वर जास्त आहे. ते जास्त ‘चांगल’ आहे हे माझ मत आहे. आपणच आपल्या कल्चर कडे डोळे-झाक केल्यामुळे, आज आपल्याला अमेरिकन लोक आयुर्वेदाचे  गुणधर्म सांगत आहेत, योगासने शिकवत आहेत. आता आपण, ह्या भारताने जगाला “ज्ञान” देण्याची आवश्यकता आहे.  जे जपान सारख्या बेचिराख झालेल्या देशाला जमल, ते आपल्या महान देशाला नक्कीच जमणार, असा मला विश्वास आहे. कारण Tie-up कॅन्सल झाल्यामुळे तुम्ही निराश न होता, मोठ्या उमेदीने अमेरिकेत जायला होकार दिलात, म्हणजेच आपल्या ह्या टीम मधे नक्कीच चांगल करून दाखवायचे गट्स आहेत. आपल्या टीमच हे नवीन  “भारतीय मॅनेज्मेंट” नक्कीच संपूर्ण जगाला एक देणगी ठरणार. ”  प्रथमेशने बोलणं थांबवल, तसं सर्वांनी टाळ्या वाजवल्या. ह्याच अर्थ सर्वांना त्याच म्हननं पटलं होत. मी तर एकदम फॅन झालो होतो त्याचा. कर्निक सर पण कौतुकाने त्याच्याकडे पाहत होते.



आता आमच्यात पण ह्या भारतीय मॅनेज्मेंट बद्दल उत्स्साह निर्माण झाला होता. 
नक्कीच, आम्ही सर्व प्रथमेशच्या बोलण्याने कन्विन्स झालो होतो. आम्हाला मनापासूनआता आपल भारतीय मॅनेज्मेंट असाव, असं वाटत होत. आज पर्यंत आपण दुसर्‍याकडून मिळालेल्या ज्ञानावर जगतं होतो, पण आज आम्हाला संपूर्ण जगासमोर आपल्या भारताची महानता नेऊन ठेवायची संधी होती.  वर्ल्ड कप जिंकल्यावर मला जसं वाटलं होत, तसाच Feel  आताही होत होता.. आमची पूर्ण टीम super-excited  होऊन उद्याच्या ट्रेनिंग ची वाट पाहत होती...

No comments:

Post a Comment