Alternate Paradigm # 3
continue.... ( From Alternate paradigm # 2)
अचानक सर्वजन माझ्याकडे पाहू लागले. कर्णिक सर पण उठून उभे राहीले.
कर्णिक सराना अस अचानक उभराहिलेले पाहून मला माझ काही चुकल तर नाही ना? अस वाटल.
सर्वानी माझ्याकडे अस पाहायाच कारण म्हणजे, मी अचानक विचारलेला प्रश्न- "Can you please elaborate your concept to me?"
ह्यावर प्रथमेश ने काही उत्तर द्यायच्या आधीच कर्णिक सर म्हणाले- प्रथमेश नक्कीच सर्वांच्या प्रश्नाच उत्तर देईल, पण आता आम्हाला एक दुसरी मीटिंग आहे, त्यामूळे आपल्याला इथेच थांबाव लागणार आहे.आपण आजच लेक्चर ऊद्या कण्टीन्यू करूयात. ''
"यस. आपण उद्या ह्यावर नक्कीच बोलूत. इनफॅक्ट, प्रॉपर ट्रेनिंगच चालू करूयात. पण With kind permission from Karnik sir, , मला आणखी एक Example द्यायाच आहे."
कर्णीकसरांकडे पाहून, त्यांची परवानगी घेऊन, प्रथमेशने एक प्रश्न विचारला - " भग्वद गीता सर्वानामाहिती आहेच.तर आपल्या कडे गीता कधी वाचली किंवाअभ्यासली जाते? "
.
" कधी म्हणजे? गीता हा आपला पवित्र अन् धार्मिक ग्रंथ आहे. हा ग्रंथ देवळात किंवा साधारणपणे रिटाइयर्मेंट नंतर आपल्याकडे वाचला जातो." गोड्बोले सरानी उत्तर दिल. पण त्यांना हा प्रश्न अगदीच 'फालतू' वाटल्याच दिसत होत.
" Exactly ! मला हेच सांगायाच आहे. भग्वद गीता हा ग्रंथ श्री कृष्णाने, अर्जुनाला सांगितला. पण कोणत्या परिस्थितीत? तर जेव्हा युद्ध चालू होणार होत, अन् अर्जुन हताशपणे बसून युद्ध टाळायला बघत होता.श्री कृष्णाने गीता सांगून अर्जुनाला युद्ध करायला, म्हणजेच 'कर्म' करायला मोटीवेट केल.
.म्हणजेच "Alternate Paradigm"च्या कॉन्सेप्ट प्रमाणे, गीता हा ग्रंथ उतार-वयात वाचायचा नसून, तो आपल्या उमेदीच्या काळात वाचायला हवा.म्हणजे आपण जेव्हा''कर्म'' करायला लागतो, तेव्हाच. माझ तर म्हणंन आहे की, वयाच्या 15-16 व्या वर्षांपासूनच हा ग्रंथ, जो "कर्मयोग" सांगतो, अभ्यासाला गेला पाहिजे. खरोखरची " Personality Development" ह्यातूनच होईल. कारण ह्या वयातच ''जग" आपल्या समोर ऊभ असत, कुरुक्षेत्रच्यायुद्धा सारख्या परिस्थितीला तोन्ड द्यायची वेळ येऊ शकते. अशा वेळी , "यंग्स्टर्स किंवा यूथ"ला मार्गदर्शन करण्याच काम गीता करेल. " प्रथमेश उत्साहित होऊन त्याच्या थियरी ची कॉन्सेप्ट सांगत होता.
ह्यावर गोड्बोले सरांना अजुन बोलायच होत पण कर्णिक सरानी मीटिन्गची आठवण करून देताच, तो विषय तिथेच थांबला. प्रथमेश आणि आम्ही सर्व जुनिअर्स हॉल मधून बाहेर पडलो. बरेचसे सीनीयर्स अन् कर्णिकसर मात्र हॉल मधेच थांबले, मीटिन्ग साठी.
उरलेला तास आम्ही आमच्या रेग्युलर कामात घालवला. ज्यानी टेली-कॉलिंगच काम केलेल आहे, त्यानाहे माहितीच असेल की, फोनवर कस्टमरच्या अपोईण्टमेन्ट घेण किंवा सर्वे करण, हे फारच त्रासदायक असत. एक तर कोणी नीट बोलत नाही, अन् त्यात एखाद्या कंपनीचा फोन आहे म्ह्न्टल तर कस्टमरच्या कपाळावरच्या 'आठ्या" फोन वरुन ही स्पष्ट दिसतात. मी नवीनच जॉइन झालेलो असल्यामुळेमाझ्याकडे फक्त 'फोन- कॉलिंग"च काम होत. जे ज्युनियर सेल्स-पर्सन होते त्यानामात्र क्लाइंट बरोबर डायरेक्ट डील कराव लागायाच.
ऑफीसमधून घरी जाईपर्यन्त प्रथमेशने मान्डलेली थीम डोक्यात घोळत होती. त्याची "आत्म्याची" थेअरी मला नीट क्लियर नव्हती झाली. पण गीता लहानपणापासूनच अभ्यासली गेली पाहिजे, हे पटलहोत.पण जस घरी पोहोचलो तस नेहमीप्रमाणे त्व समोर बसलो. ह्या तमाम ''आई" मंडळीना आपला मुलगा त्व समोर शान्तपणे बसलेला बघवत नाही. त्यांच आपलचालूच असत, 'अरेहात-पाय धू अगोदर, ती बॅग अशी का फेकलीस?, कपडे तरी चेंज करायचे होतेस ,इत्यादी, इत्यादी.'
काही वेळाने सुहास चा कॉल आला.सुहास हा माझा शाळेपासुनचा मित्र. त्याच BBA झाल होत अन् सध्या 2-3 वर्ष तो फक्त CSवर "कॉन्सेंट्रेट" करणार होता. आम्ही नेहमीच्या कट्ट्यावर बाकीच्याना भेटायला जाणार होतो, अन् त्यासाठी तो मला घ्यायला येणार होता. आम्ही सर्वजण खाण्याच्या बाबतीत अगदी खवय्ये होतो ... मी लगेच सगळ्याना भेटायचा प्लान वॉट'स अप केला. पण एकजण वेळेवर आला तर शप्पथ. बर झाल, येताना मी आणि सुहास ने ऊस्मान चे भजे-पाव पोटात सारले होते. बाकीचे येईपर्यंत आम्ही निराला बाजार '' न्याहाळात'' बसलो. काही "दिसल" की, सुहास " गुदगुल्या" झाल्यासारख हलत होता. हळूहळू एकेकजण जमला. थोड्या वेळ "ईकडे- तिकडे" बघत आम्ही पिक्चरचा प्लॅन ठरवला. पुढच, सगळ नेहमीप्रमाणेच, बाहेर जेवण आणि रात्री घरी जाण. लाइफ यापेक्षा चांगली असूच शकत नाही. अस माझ प्रामणिक मत होत. उद्या सकळी परत होतच नेहमीच रुटीन.
...to be continue...
No comments:
Post a Comment