Saturday, 1 November 2014

Alternate Paradigm # 2

Alternate Paradigm # 2

continued...
काय संबंध भारताच्या संस्कृती चा आणि OD चा??? हा माणूस वाट्टेल ते बोलतोय अंन् आम्ही त्याला ट्रेनर मानून ऐकून घ्यायच? बाकींच्या चेहा-यावर पण हेच प्रश्नचिन्ह होत….
पण जस त्याने बोलण पुढे चालू ठेवल,, तस मला हे काहीतरी वेगळ असल्याची जाणीव झाली. मी माझ्या नकळत त्याला रेस्पेक्ट करू लागलो होतो. त्याने मांडलेले विचार, ज्याना तो “आल्टर्नेटिव पॅरडाइम” म्हणत होता, ते खरच नवीन अन् वॅल्युवबल वाटले मला. त्यांच बोलन आता मी नीट ऐकू लागलो…



“आपल्या हजारो वर्ष जुन्या ह्या देशात प्रत्येक गोष्ट उपलब्ध आहे, निसर्ग समृद्धी आहे, ह्यूमन रीसोर्स आहे, ऑपर्चुनिटीस आहेत.  वेगवेगळे धर्म आहेत, योगा आहे, आयुर्वेद आहे.”…  
“एक अस ज्ञानआहे, जे आपल्या या देशाला, आपल्याला महान, समृध्द आणि भव्य बनवू शकत. 
गरज आहे ती हे ज्ञान नव्या दृष्टीकोनातून पाहायची.
           “ तुम्हाला वाटात असेल, हा प्रथमेश नेमक काय बोलतोय? OD आणि ह्याचा काय संबंध आहे? वेल, त्या अगोदर मी माझ कार्यक्षेत्र सांगतो. काही दिवसापूर्वी माझी अन् कर्णिक सरांची भेट झाली होती. मी त्यांचाकडे फाइनान्षियल मदतीसाठी गेलो होतो.  माझ्या R & D फील्ड मधे फंड्स मिळावेत म्हणून.माझ्या R & D चा विषय आहे- The Indian Epics and Human Life. 
              ज्यात मी धर्मग्रंथात सांगितली गेलेली तत्व ह्यांचा ह्यूमन लाइफसाठी होऊ शकणारा उपयोग ह्यावर काम करत आहे. आता ह्यूमन लाइफचा अर्थ मी जरा स्पेसिफिक ठेवलाय, तो म्हणजे ह्यूमन लाइफ इन ऑर्गनाइज़ेशन. ज्याला मॉडर्न भाषेत HRM म्हणतात. मी जेव्हा आपले धर्मग्रंथ अभ्यासले, तेव्हा माझ्या अस लक्ष्यात आल की, त्यातली तत्व ही फक्त पूजा, कर्मकांड किवा एखाद्या पन्था पुरती मर्यादित नसून, ही तत्व संपूर्ण मानवी आयुष्य, समाज, शासन, ऑर्गनाइज़ेशन ह्याना पण लागू आहेत. प्रत्येक प्रश्नाच उत्तर अगोदरच उपलब्ध आहे,. गरज आहे ती फक्त “Alternate Paradigm” ची”.


             “ एखाद example द्यायच झाल तर, - Law of Conservation of Energy सांगतो की- ‘The law of conservation of energy is a law of science that states that energy cannot be created or destroyed, but only changed from one form into another or transferred from one object to another.  आता आपल्या तत्वज्ञानात हे अगोदरच सांगीतल गेलेले आहे. तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल ह्याबद्दल?”
प्रथमेशच्या अनपेक्षित प्रश्नाने सर्वजण विचारात पडले. कर्णिक सर मात्र अगोदरच उत्तर माहिती असल्याप्रमाणे आमच्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होते. अगोदरच आम्ही सर्वजन धर्म अन् मॅनेज्मेंटच रीलेशन असत हे ऐकून चक्रावलो होतोच, त्यात, साइन्सचा हा लॉ आपल्याला अगोदरच सांगण्यात आलेला आहे, हे ऐकून डोक Hang झाल होत माझ. Peon ने नेमका आणलेला चहा सर्वांच Energy Booster ठरला.  ह्या टी- ब्रेकमुळे प्रथमेशच Interaction थोडा वेळ थांबल.
 
ईतर ट्रेनिंग-सेशन मधेपण असा चहा आला की, सर्वाना “सुटलो बुवा, काही वेळा साठी ह्या ट्रेनिंग मधून’अशा अर्थाच्या चर्चा व्हायच्या.पण आज सर्वजन टी- ब्रेक मधे पण प्रथमेशच्या बोलण्यावर गंभीरपणे चर्चा करत होते. सर्वाना उत्तर जाणून घ्यायची इतकी ईच्छा होती की, टी- ब्रेक चालू असतानाच, एका सीनियरने, मि.गोडबोल्यानी प्रथमेशलाच उत्तर द्यायला संगितल. मि. गोडबोले, हे नावाला जागनारे होते. समोर गोड बोलणारे अन् मागे गॉसिपिंग करणार. तेच गोडबोले आज स्वत:हून विचारात होते म्हणजे, सर्वाना प्रथमेशच्या बोलण्यात इंट्रेस्ट असल्याच लक्ष्यातयेत होत. माझी पण condition  फारशी वेगळी नव्हती.
“बर सांगतो.” परत एकदा प्रसन्न हसूनप्रथमेशने सुरूवात केली. “ आपण सर्व ह्याच उत्तर अगदी लहानपण पासून ऐकत आलोय.  नैन छिन`दती शस्राणि नैन दहाती पावक : आणि 2.22  क्रमांकाचा भगवद गीतेतला श्लोक  … हे आत्म्याच वर्णन म्हणजेच माझ्या स्टडी प्रमाणे कुठेतरी लॉ ऑफ एनर्जी ला कनेक्टेड आहे.  (सगळ्याबरोबरमाझ्या पण तोंडातून “काय?” असा प्रश्न बाहेर पडला.)माझा ह्यावर अजुन रिसर्च चालू आहे.  मी मघाशी वापरलेला शब्द “ आल्टरनेट पॅरडाइम” हेच सजेस्ट करतो. कस ते एक्सप्लेन करतो. आपल्यात, एखाद्या शरीरात आत्मा असण हेच जिवंतपणाच लक्षण मानल जात.  जर आत्मा नसेल तर त्या जीवाला- निर्जीव मानला जातो. जस एखाद मशीन, एनर्जी शिवाय चालू शकणार नाही, अगदी तसच. जस आत्म्याला नष्ट करता येत नाही, तसच एनर्जी पण नष्ट होऊ शकत नाही. फक्त एका फॉर्म मधून दुसा-या फॉर्म मधे रुपांतरीत होते. म्हणजेच  आत्मा ची थियरी आजच्या मॉडर्न साइन्स मधे एनर्जी च्या रूपात मांडली गेलेली आहे, अस माझ “आल्टरनेट पॅरडाइम” सांगत.”
अशाच प्रकारे माझी  स्टडीचालू आहे ज्यात मी फक्त हिंदू संस्कृतीच नाही तर, बाइबल, क़ुअरान, बुद्धीझम ह्यांचा ही अभ्यास करणार आहे. अंन् हे सर्व करण्यासाठी मला फंड्स ची आवश्यकता आहे.
मि. कर्णिक ह्यांच्याकडे मी जेव्हा फंडिंग साठी गेलो होते, तेव्हा आमची ह्या विषयावर बरीच चर्चा झाली होती. त्यानी मला फंड्स द्यायला लगेच होकार दिला. पण मला अस डायरेक्ट मदत घेण आवडणार नव्हत, म्हणून मीच त्याना सजेस्ट केल की,  मी तुमच्या कंपनीच्या कामात काही मदत करू शकलो तर मला आनंदच होईल. Thanks to कर्णिक सर ज्यानी माझ्या विनंतीला मान देऊन हा जॉब मला ऑफर केला.

अचानक सर्वजन माझ्याकडे पाहू लागले. कर्णिक सर पण उठून उभे राहीले.
कर्णिक सरांना अस अचानक उभ राहिलेल पाहून मला माझ काही चुकलM तर नाही ना? अस वाटल.

...to be Continued... 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( This writng is not intended to hurt or criticize any of Great Epics or Dharma.)
Reference ;-
1. Bhagvad Gita. 2. Gita Rahasya ( Lokmany Tilak) 3. Various Science,  Management, Behaviour books.

No comments:

Post a Comment