Alternate Paradigm # 1
आजचा दिवस …
सकाळी नेहमी प्रमाणे जाग आली. अलार्म न लावता ही ५.३० ला उठलो आहे ,ह्याची खात्री करून घेतली. काही दिवसापूर्वी अलारम वाजला तरी, घड्याळात किती वाजले हे पहायचो, कशा कडेही संशयाने पाहायची सवयच लागली होती
.कशाचीच खात्री नव्हती. पण आता ''सब- कॉनशीयस् माइंड" वर विश्वास होता. इतक्या दिवस ‘Transformation ’ बद्दल ऐकून होतो, पण आज, आत्ता तो अनुभवतोय.
पण काही दिवसापूर्वी हे चित्रा बराच वेगळ होत… प्रथमेश भेटण्याच्या अगोदर.
काही महिन्यापुर्वी…
“गिरीश, चहा ठेवू का?’’ आईचा नेमीचा प्रश्न, न चुकता विचारला जाणारा. माझ उत्तर असायच “व्यायाम केल्यावर… पण करू का आज व्यायाम?” व्यायामाची मला फारशी आवड नाहीए, पण 26 व्या वार्षीच पोट सुटू लागल्यावर व्यायाम करावाच लागतो.
व्यायाम करत असताना ते ऑफीस मधे जाई पर्यंत माझ्या डोक्यात आज जॉइन होणार्या एका नव्या एंप्लायी बद्दल विचार चालू होता. एक जन “ऑर्गनाइज़ेशनल डेवेलपमेंट” ह्या पोस्ट वर येणार होता. मला जॉइन होऊन साधारण 3 महिनेच झाले होते. Thanks to MBA, ज्यामुळे मला नौकरी मिळाली होती, नाहीतर आजकाल ग्रॅजुयेशन ला कोण विचारात हो?
माझा दिवसभर MBA मधे शिकलेल्या “OD” बद्दल विचार चालू होता. बर्याच सीनियर्स च म्हणंन होतकी हे OD म्हणजे एक फॅड आहे. चांगला performance देतियेकी आपली कंपनी. मग कशाला हव हे OD ? आता परत काही दिवस ट्रेनिंग आणि कंपनीच काम ह्याच शेड्यूल मॅच कराव लागणार.
दिवसभर ह्यावरच चर्चा चालू होती. जॉइन झाल्या पासून मला एक समजल होत की, ऑफीस मधे गॉसिपिंग साठी कुठलाही विषय चालतो. त्यातल्या त्यात माझ्या, म्हणजे मार्केटिंग डिपार्टमेंट मधे तर विचारायलाच नको. आज येणार्या एम्प्लोईची ओळख खुद्द बॉस करून देणार असल्यामुळे तर सर्वानाच कुतूहल होत. माझ्या दोन क्यूबिकल सोडून बसणार्या, आणि माझ्या 3 महिने अगोदरच जॉइन झालेल्या, इरावतीला मात्र काहीच घेंण देण नसल्यासारख वाटत होत. तीच आपल वेगळच काही तरी चालू असायच नेहमी. माझ बारीक लक्ष असायच. तस सगळीकडे असायच लक्ष म्हणा माझ..
Peon दुपारी लंच नंतर निरोप घेऊन आला की सर्वांना ट्रेनिंग हॉल मधे बोलावलाय. म्हणजे OD चा ट्रेनर आला होता तर… आम्ही सर्व जन आपापल्या पोस्ट नुसार तयारी केली, म्हणजे सीनियर्स लॅपटॉप घेऊन तर, माझ्यासारखे जुनियर पेन आणि नोट पॅड घेऊन एकदचे दाखल झालो.
मला ट्रेनिंग हॉल ही जागा फार आवडते. छान एसी असतो, समोर स्क्रीन वर ट्रेनिंगप्रोग्रॅम चालू असतो, आपण फार मन लावून समजावून घेतोय अस नुसतदाखवावलागत. बरेचसे ट्रेनिंग प्रोग्रॅम, ट्रेनिंग हॉल मधून बाहेर पडण्याअगोदरच ‘संपतात’. माझा गेल्या 3 महिन्याचा अनुभव आणि सीनियर्स चा अनेक वर्षाचा अनुभव, तर हेच दाखवत होता.
एक गंमत आहे .माहीत नाही, तुम्ही ह्याल काय म्हणाल, पण ट्रेनिंग हॉल मधे एरावाती चा चेहरा नेमका माझ्यासमोर येईल अशी सिट्टिंग अरेंज्मेंट कशी व्हयायची? मी तर ह्याला योगायोग म्हणतो.
आजही मी एक "चांगली" जागा पाहून बसलो होतो. डोक्यात आजच्या ट्रेनरचा विचार चालू होता. आम्हाला अगोदरच त्याच एक जनरल प्रोफाइल दिलेल होत.म्हणजे त्याच एजुकेशन- म्हणजे MBA, एरिया ऑफ इंट्रेस्ट-R & D in Human Sector, वगैरे वगैरे. म्हणजे नक्कीच 45-50 वयाचा एक माणूस असेल अस माझ लॉजिक होत.
थोड्या वेळाने आमचा बॉस, मि. कर्णिक आले. ह्या माणसाने मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही हे खोट असल्याच सिद्ध केल होत. आमची कंपनी चांगली नावाजलेली होती. एका अमेरिकन कंपनी बरोबर आमच टाय-अप होणार होत. बॉस बरोबर एक मुलगा आला होता. फॉर्मल कपडे होते, टाय नव्हता. म्हणजेहा त्या ट्रेनर चा असिस्टेंट दिसतोय, त्याना असिस्ट करण्यासाठी, माझ आजुन एक लॉजिक.
मि. कर्णिक हे नेहमीच कामावर प्रेम करणारे बॉस आहेत, त्यामुळे जोक्स वगैरे त्याना मानवायाच नाही. पण त्यांच आताच वाक्य ऐकून मला नक्कीच हसायल आल. ईतर कलिग्सची पण यापेक्षा फारशी वेगळी प्रतिक्रिया नव्हती. नक्कीच बॉस आज गंमत करण्याचाय मूड मधे होते. काय तर म्हणे, त्यांच्या बरोबर आलेला मुलगा, हा आमच्यास्टाफ ला ट्रेनिंग देणार होता. मी त्याच नीट निरीक्षण केल, फार तर 2,3 वर्ष वयाने ज्यास्त होता तो माझ्यापेक्षा. आमच शिक्षण ही सारखच होत. हा आम्हाला काय ट्रेनिंग देणार अंन् ते पण ODच? बॉस ने तची ओळख करून दिली- “हे मि. प्रथमेश .आजपासून आपल्याला जॉइन होत आहेत. मला माहिती आहे तुमच्या मनात सध्या काय चालू आहे ह्यानाबघून( बॉस त्याला अरे-तुरे ऐवजी आदरार्थी बोलत होते.)
मी जेव्हा ह्याना पहिल्यांदा भेटलो, तेव्हा मला पण तुमच्यासारखच वाटल होत. ( नक्कीच बॉस त्याच्या वयाबद्दल बोलत आहेत. बॉसला आमच्या मनातल बरोबर समजल. उगाच नाही ते ‘बॉस’ झालेत- माझे आपले विचार चालूच होते.)अन् दुसरा प्रश्न असा असेल की आपल्याला OD ची काय गरज आहे? वेल, ह्या दोन्ही प्रश्नाची उत्तर तुम्हाला मि. प्रथमेशच देतील. मी त्याना ट्रेनिंग ची सुरूवात करण्याची विनंती करतो.”
खर सांगतो, सुरवातीला माझ्या मनात त्या प्रथमेश बद्दल काही रेस्पेक्ट वाटला नाही. अंन् त्याच्या बोलन्याने तर नाहीच नाही… हसण मात्र त्याच छान होत. एकदा छानससी हसून, आमच्या सर्वाकडे बघून प्रथमेशने बोलायला सुरूवात केली…
“नमस्कार!
आपला भारत देश हा विविधतेने नटलेला, असा परंपरागत देश आहे. अशा परंपरा ज्या वेगवेगळ्या फिलॉसोफी, धर्म, संस्कृती, चालीरिती ह्यातून प्रकट होतात. पण गेल्या काही शतकापासून आपण आपली ही “ओळख” विसरत चाललॉय. किवा, माझ्या मता प्रमाणे, त्याचा योग्य तो अर्थ माहिती नसल्यामुळे, आपली ही ओळख, जी संपूर्ण जगाला एक “देणगी” ठरू शकते,,नेहमीच दुर्लक्षित राहीलेली आहे.” …..
काय संबंध भारताच्या संस्कृती चा आणि OD चा??? हा माणूस वाट्टेल ते बोलतोय अंन् आम्ही त्याला ट्रेनर मानून ऐकून घ्यायच? बाकींच्या चेहा-यावर पण हेच प्रश्नचिन्ह होत….
पण जस त्याने बोलण पुढे चालू ठेवल,, तस मला हे काहीतरी वेगळ असल्याची जाणीव झाली. मी माझ्या नकळत त्याला रेस्पेक्ट करू लागलो होतो. त्याने मांडलेले विचार, ज्याना तो “Alternative Paradigm” म्हणत होता, ते खरच नवीन अन् Valuable वाटले मला. त्यांच बोलन आता मी नीट ऐकू लागलो…
....to be continued...
No comments:
Post a Comment