Monday, 12 June 2017

मित्र-मैत्रिणींनो माझं नुकतच एक पुस्तक पब्लिश झालाय.. " पार्टनर" नावाच . त्यातील हे एक article  नक्की वाचाच... :)


partner link click here

प्रथमेशकडून विश्लेषण ऐकल्यानंतर मी कसाबसा घरी पोहोचलो..
त्या संपूर्ण रात्री मला स्वतः चाच राग येत होता. मी किंवा माझं मनचं माझं शत्रू झालं होत, जे स्वतःहून मला वाईटाकडे आकर्षित करत होतं. मी स्वतःला शिव्या देत देत दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळची वाट पाहू लागलो.
पण, दुसरा पूर्ण दिवस ही मी अस्वस्थ होतो. सारखं वाटंत होतं, कसलं नशीब घेऊन जन्मलोय मी.. माझीच विचारसरणीच माझी शत्रू? माझ्याच बाबतीत असं का घडलं असेल? बाकीचे लोकं कसे सुखाने राहत होते, अन मी मात्र स्वतःचाच शत्रू झालो होतो.
अशा विमनस्क अवस्थेत आदली रात्र, अन दुसरा संपुर्ण दिवस मी कुढत, चिडत काढला.
   प्रथमेशने सांगितलेलं मला अर्थातच पटलं होतं. ज्याप्रमाणे मीच रस्ता निवडला होता, अन त्याबाबतची रिऍक्शन पण माझीच होती, अगदी त्याचप्रमाणे  माझ्या समस्या आणि त्यांच्यावरची रिऍक्शन हे माझ्या संकटांच मूळ होतं.
संध्याकाळी मी प्रथमेशला नेहमीच्या ठिकाणी भेटलो.
"प्रथमेश.. मला टेन्शन आलंय खूप. तुझ्याकडे आहे ना ह्या सर्वांवर उत्तर? प्लिज हो म्हण." मला पूर्णपणे हतबल झाल्यासारखं वाटंत होतं.
" हो. तुला फक्त तुझा 'अटीट्यूड' बदलायला हवा."
"हो.. मी तयार आहे.तू फक्त सांग काय अन कसं करायचं ते." मी घाईघाईत म्हणालो.
"आणि तसं ही मी तू सांगितल्याप्रमाणे मोटिव्हेशनल बुक्स वाचायला सुरुवात करणार आहे. त्याने मदत होईल ना?"
"होईल.. पूर्णपणे नाही पण.."प्रथमेश म्हणाला.
"काय करावं लागेल अजून मला ?" मी आणखीनच अधीर होत विचारलं.
"Well.. तुझी तयारी असेलचं, तर तुला 'शरणागती' पत्करावी लागेल." प्रथमेश काहिसा विचार करून म्हणाला.
"शरणागती? काय सांगतोयस तू हे? मला वाटलं, तू मला लढायला सांगशील, परिस्थितीशी दोन हात कर, असं काही सांगशील.. पण तू तर चक्क मला हार मानायला सांगतोयस.. नाही जमणार मला हे! मी परिस्थितीला शरण जाऊन हार पत्करणार नाही. सॉरी."  मला खरंच राग आला होता त्याक्षणी. मी तो लपवला पण नाही. मी जरा रागानेच प्रथमेश कडे पाहिलं.
पण प्रथमेश माझ्याकडे हसून पाहत म्हणाला,  "चल दिनेश, आपण एक खेळ खेळूया. लहान असताना आपण सर्वजण खेळलेलो आहोत तो खेळ."
"लहानपणाचा खेळ?" मला पहिल्यांदाच प्रथमेश बद्दल शंका आली. हा माझी गंमत करतोय का?
मी विचित्र नजरेने प्रथमेशकडे पाहत विचारलं, "कोणता खेळ?"
"आंधळी कोशिंबीर"… प्रथमेशने म्हटलं.
........तो असं म्हणताच काय म्हणावं ते न सुचल्यामुळे मी फक्त त्याच्याकडे बघत राहिलो.
शेवटी प्रथमेशचं म्हणाला, " दिनेश, मला समजतंय, कि तुला हे सगळं समजून घ्यायला त्रास होतोय.. पण तू जरा शांतपणे विचार कर.. हवं तर आणखीन एक कॉफी मागवूयात तोपर्यंत."
आम्ही कॉफी घेतं असताना मी शांतपणे विचार केला.
मला जरी प्रथमेशचं आत्ताच बोलणं 'Weird' वाटंत असलं, तरी त्यात काहीतरी अर्थ नक्कीच दडला असणार. नाही तरी त्याने माझ्या समस्येचं विश्लेषण अशाच पद्धतीने तर केलं होतं, हे मला विसरून चालणार नव्हतं.
आणि तसंही, प्रथमेशने सांगितल्याप्रमाणे माझी सध्याची नैसर्गिक रिऍक्शन ही चुकीची असू शकली असती. शेवटी मी त्याच्यावर विश्वास ठेवायचं ठरवलं.
आंधळी कोशिंबीर, तर आंधळी कोशिंबीर!

Thursday, 2 February 2017

प्रथमेश : एक पार्टनर


वाचक मित्रांनो माझं Ebook प्रकाशित झालंय.
आणि ते बुकहंगामा आणि अमेझॉन, ह्या दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे. जर तुम्हाला तुमच्या Attitude मध्ये बदल घडवून ( अर्थातच चांगला बदल) आणायचा असेल, तर हे इ-बुक नक्की वाचा.
लिंक्स पुढीलप्रमाणे आहेत Partner Book hungama
आणि amazon. partner




Wednesday, 25 January 2017

नुक्कड साहित्य "स्नेहमिलन"

(आमच्या वार्ताहराकडुन) May 2017.
..तर काल दोन दिवसीय 'नुक्कड साहित्य स्नेहमिलन" संपन्न झालं.
नावापासूनच वेगळेपण जपणाऱ्या ह्या 'स्नेह-मिलन'ने सम्पूर्ण साहित्य विश्वाला आपली दखल घ्यायला लावली, हे मात्र खरं..
पण,  असं वेगळं काय होतं? हे जाणून घ्यायला आमच्या वाचकांना नक्कीच आवडेल.


...."नुक्कड" च्या संमेलनाची सुरुवातच झाली, ती लेखक आणि वाचक ह्यांच्या समावेशातून.. महाराष्ट्रात 'साहित्य'हे फक्त लेखकांपूरतच मर्यादित कधीच नव्हतं.. त्याचा वाचकवर्ग ही एक मुख्य भाग राहिला आहे..
.. आणि हेच सत्य लक्षात घेऊन "नुक्कड" च्या साहित्य संमेलनाची आखणी झाली होती.. म्हणजे ह्यात काय असावं, काय असू नये इथपासून ते स्थळ, काळ, वेळ ह्यातही लेखक आणि वाचक ,ह्या दोन्ही घटकांनी प्रमुख भूमिका निभावली.
आणि सर्व ठरल्यावर हे दोन दिवसीय स्नेहमीलन पार पडलं..
.........
             पण, इथेच हे वेगळेपण संपत नाही. कारण ह्या संमेलनात लेखक आणि वाचक ही दरी मिटवून टाकण्यात आली होती.. ईतर साहित्य संमेलनात लेखकांसाठी मंच/स्टेज असतो, आणि वाचकांसाठी समोर बसण्यासाठी खुर्च्या असतात.
पण अशा अरेंजमेंट मुळे लेखकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या वाचकांना आपल्या जिवाभावाच्या लेखकांना भेटता येत नाही, आणि ह्या दरी मुळे संमेलनाच्या शेवटी वाचकांना "आम्हाला ह्यातून काय मिळालं?" असा प्रश्न पडत असतो.. पण ही दरी इथे नव्हतीच..
             ..इथे चक्क लेखक आणि वाचक ह्यांच्यात हा दुरावा मिटवून टाकण्यात आला होता. स्टेज/ मंच अशी भानगड न ठेवता, भारतीय बैठक मांडण्यात आली होती, ज्यावर लेखक अन वाचक मिळूनमिसळून बसले होते, आणि त्यावरून 'स्नेहमिलन' हे नाव सार्थ ठरत होतं.
लेखक- वाचक संवाद ह्या खेळीमेळीच्या वातावरणात किती आनंदात पार पडला असेल,हे वेगळं सांगायला नकोच. (अर्थात मान्यवरांची विशेष व्यवस्था करण्यात आली होती,पण नंतर ते देखील ह्या संवादात 'सामील' झाले.)
             
                  आणि मान्यवर, लेखक आणि वाचक ह्यांच्या ह्या बैठकीत पुस्तकं, वाचकांची त्यावरची प्रतिक्रिया, लेखकाबद्दलची वाचकांना, आणि लेखकाना त्यांच्या वाचकांबद्दल असलेली उत्सुकता, हे सर्व ह्या स्नेहमिलनात अनुभवायला मिळालं.
ह्यांनंतर गझल, कविता आणि काही निवडक कथांच वाचन पार पडलं.
              .. पण ह्या सर्वावर 'सोने पे सुहागा' ठरलं, श्रीविक्रम भागवत ह्यांनी वाचकांसाठी  घेतलेलं 'वर्कशॉप'..
ह्या 15 मिनिटांच्या वर्कशॉपमध्ये भागवत ह्यांनी 'लेखन कार्यशाळा' घेऊन वाचकांना चक्क 'लेखक' बनण्याचा अनुभव घेऊ दिला..वाचकांनी काही काळासाठी तरी 'लेखक' बनून आपल्या भावना 'लिहून' व्यक्त केल्या.
.. असं हे सर्वसमावेशक संमेलन, नव्हे, "स्नेहमिलन", ज्यात कुठलाही बडेजाव नव्हता, ना दिखावा होता.. इथे साहित्यिक- सामान्य माणूस हा 'भेदाभेद अमंगळ'  मानून सर्वाना सामावून घेण्यात आलं होतं.. जी सम्पूर्ण महाराष्ट्रासाठीच अभिमानाची गोष्ट आहे.  "साहित्य संमेलनातून आम्हाला काय मिळतं?" हा सर्व सामान्यांना पडणारा प्रश्न ह्या सर्वसमावेशक साहित्य संमेलनाने निकालात काढला, हे मात्र खरं.. आणि  फेसबुकच्या जमान्यात आजची तरुणाई ही साहित्याशी आपली नाळ जोडून आहे,(ते ही फेसबुक चा वापर करून) ही सुखावणारी गोष्ट आहे. हे स्नेहमीलन साहित्यिक आणि वाचक ह्यांच्याबरोबर महाराष्ट्राची सांस्कृतिक झोळी आनंदाने भरणार ठरलं.
असं हे नुक्कडचं पहिलंच संमेलन परत कधी भरणार, ह्याची हुरहुर घेऊनच सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.