Friday, 20 May 2016

फरक करता यायला हवा


"फरक करता यायला हवा"

काय हो, तुम्हाला असं नाही वाटत कधी की, आपण फारच अघळपघळ वागतो. म्हणजे आपल्या विचारांमध्ये 'स्पेसिफिक' अस् जरा कमीच् आहे म्हणुन ?(अस् म्हणतात की, आपल् मागणं जर् स्पेसिफिक नसेल, तर देव पण ते पुर्ण करंत नाही.. पण असो, तो जरा दूसरा विषय आहे.)
म्हणजे विचारांमध्ये असं 'ठराविकपणं' येण्यासाठी काही सारख्या, समानार्थी भासणाऱ्या गोष्टीमध्ये आपल्याला फरक करता यायला हवां, असं मला वाटतं.
आता हेच पाहाना.. हुशारी आणि शहांणपणं हे दोन शब्द वरवर जरी एकच वाटले, तरी हुशारी ही अभ्यासापुरतीच मर्यादीत ठेवता यायला हवी.. तिचा उपयोग मित्रांसमोर करण्यात काहीच अर्थ नाही. मित्रांबरोबर वागताना शहाणपणंचं कामाला येतं.
आता मित्रांचा विषय निघालाच् आहे तर, (खुष मस्करे) दोस्त आणि खरे मित्र( हे फार्फार तर 2,3 असतात.) हयात ही फरक करता यायला हवा. सगळ्यांना ह्याचा अनुभव असेलच्.( संकट काळी मदत करतो, तोच खरा मित्र, असं म्हणतात ते उगाच् नाही. असो.)
जे सध्या शिकत आहेत, किंवा सध्या पोटार्थी काही काम करत आहेत, त्यांना जॉब आणि करियर हयात फरक करता यायला हवा, म्हणजे पुढे जाऊन होणारी घुसमट टाळता येईल.
आणि हो, काम करताना होणारी दगदग् व घ्यावी लागणारी मेहनत, हयात ही फरक करता यायला हवा. कारण सध्याच्या जगात इलेक्ट्रॉनिक्स मुळे 'मेहनत' अशी ही उरलीच नाहीये. आहे ती फक्त दगदग. कदाचित्, त्यामुळेच आपण अपेक्षित मेहनत न केल्यामुळे अपेक्षित 'फळ' मिळत नसेलं. म्हणून दगदग आणि मेहनत हयात फरक करायला हवा.
इलेक्ट्रॉनिक्स मुळे माहितीचा खजिना आपल्या बोटांवर नाचतोय सध्या..(पूर्वी जिभेवर सरस्वती नाचायची.काळाचा महिमा, दुसरं काही नाही. असो.) पण महत्व त्यालाचं असतं, जो ज्ञानी आहे. त्यामुळे माहिती आणि ज्ञान हयात फरक हा करता यायलाच हवा.
(आणि माहितीला ज्ञानामध्ये 'कन्वर्ट' करता यायला हवं.)
काम करतानाही, मग ते कोणतही असू दे, कामात 'बिझी'असणं आणि 'खरंच काम करणं' हयात फरक करता यायला हवा.. कारण,आपण जेव्हा मी बिझी आहे, अस् म्हणतो, तेव्हा बऱ्याच वेळेला आपण स्वतः चीच खोटी समजूत काढत असतो.( लहानपणी नाही का, आपण दिवसभर अभ्यासामध्ये बिझी असायचो, पण डोक्यात फार कमी शिरायच्, तसचं. असो.).. (हे 'असो, असो' फारच होतय् का आज? असो). म्हणून पुढच्यावेळी आपण बिझी आहोत का खरचं काम करतोय हयात फरक करायला हवा.
स्वैराचार आणि स्वातंत्र्य हा अगदी चोथा झालेला विषय आहे. पण म्हणजे नेमकं काय? हे कोणाला नीटसं माहिती नसल्यामुळे आपल् वागण् कशात मोडतं, ह्याच आकलन बऱ्याच जणांना होत नाही.
स्वैराचार म्हणजे बुद्धि न वापरता, इतरांच्या भावनांची दखल न घेता केलेलं कृत्य.. तर स्वातंत्र्य म्हणजे ''Courage with Consideration".
त्यामुळे देशाचे नागरिक म्हणून वावरताना स्वैराचार आणि स्वातंत्र्य हयात फरक करता यायला हवा.
सध्या इथेच थांबतो. उर्वरीत पुढील ब्लॉग मधे..

खरा पराभव

"खरा पराभव" 
..शेवटी एकदाची ती उपांत्य पूर्व फेरीची टेनिस मॅच संपली.
त्याला बराच झुंजाव लागलं , पण शेवटी तो हरलाच.खर पाहता, तो जिंकायला हवा होता. कारण तो नॅशनल लेवल वरचा चॅम्पियन होता, अन् प्रतिस्पर्धी तर अगदीच नवखा होता. पण प्रतिस्पर्ध्याने अगदी मनापासून खेळ केला.
प्रथेप्रमाणे प्रतिस्पर्ध्याने सामना संपल्यावर शेक-हॅंड साठी हात पुढे केला, पण त्याने तो झिडकारला. हरणं फारच जिव्हारी लागल होत त्याच्या..
प्रशिक्षक समोर येताच त्याचा स्वतः वरचा ताबा सुटला. हातातली लकी रॅकेट फेकून त्याने आरडाओरडीला सुरुवात केली.. " मी हरुच् कसा शकतो? त्याची लायकी तरी होती का, माझ्या समोर उभं राहण्याची? अन् चालला मला शेक- हॅंड करायला..खर तर माझीच जास्त लायकी आहे सेमी फायनल ला खेळण्याची.. हे असं नेहमी माझ्या सोबतच् का होत नेहमी.. देव पण मलाच असली शिक्षा का देतो? पहा कसा मिरवतोय तो जिंकल्यावर्.. पुढे जावून नक्कीच हरणार तो.. माझा शाप आहे त्याला.. सर, खर तर तुमचीच चूक आहे ही.. तुम्हीच नीट प्रॅक्टीस करून घेतली नसणार माझ्याकडून, म्हणून तर मी हरलो ना.. नाहीतर मी हरुच् शकत नाही.अन् मला सांगा, तुम्ही त्याच अभिनंदनच का केलतं?”
असचं काही बाही बडबडत् सुटला तो..
अन् इथेच खराखुरा पराभव झाला त्याचा.. "हरणं" हा खेळाचाच एक भाग असतो, हे त्याने समजून घेतलचं नाही.. एका हरण्याने आयुष्य थांबत नाही, हे तो शिकलाच नव्हता..
त्यासाठी स्वत:च नुकसान देखील त्याने करून घेतल होतं.
खेळावरच्या प्रेमापेक्षा, हरण्यावरच्या रागाला त्याने जास्त महत्त्व दिलं.

स्थायीभाव

"स्थायीभाव"
..गेले काही दिवस त्याच्या मनाची जीवघेणी घालमेल होतं होती. कशातच् लक्ष लागत नव्हतं.
एकच प्रश्न वारंवार छळत् होता..
"मी इतकं प्रेम केल् तिच्यावर.. इतका जीव लावला तिला.. तिने झिडकारल् आपल्याला, तरी अजूनही आपण तिच्यावर इतकं बेफाम, आणि खरं प्रेम कस् करू शकतोय? "का"?? तगमग झाली होती त्याच्या जीवाची..
तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. त्याने आशेनी पाहिलं, पण नंबर मित्राचा होता. वाटल, नको उचलायला. पण सवयीने फोन उचलला.
"अरे सॉरी.. काल तूला मला तिच्याबद्दल सांगायच होतं, पण मला खरंच वेळ नव्हता.. आता परत भेटल्यावर सांग. बरं.. माझ एक काम होत रे तुझ्याकडे..
" माझ्याकडे संध्याकाळी एक क्लायंट येतोय.. त्याला प्रेझेंटेशन द्यायचय.. मग तेवढा एक प्रोजेक्ट रिपोर्ट करून देना.. मी डिटेल्स मेल करतो." मित्राच् कालचं वागण् आठवूण तो त्याला नकार देवु शकत होता, पण त्याने मदत करायला हवी असा निर्णय त्याच्या मनाने नकळतच घेऊन टाकला. फोन वरच थोडी बहुत माहिती विचारली.
"बरं. दे पाठवून. मी करतो."
होकार देऊन त्याने फोन ठेवला, अन् अचानक त्याला त्याच्या वागण्याच् कारण गवसल्..अन् मन हलक हलक झालं.
तगमग संपली, मनात एक आनंद भरून वाहु लागला. तिच्यावर अस् भरभरुन प्रेम का केल्, ह्याच उत्तर मिळालं.
जगाने त्याला कसंही वागवलं, तरी जगाशी चांगलचं वागण् हा त्याचा स्थायीभाव होता. इतरांना मदत करण, हे जसं त्याच्या आतून येत होत, तसंच तिच्यावरच प्रेम आतून आल होत.
त्याच् अस् निस्वार्थ,बेफाम 'खरं प्रेम' करता येणं हे तिचं कतृत्व नव्हतं, तर ह्याचाच तो स्वभावगुण होता.. देवासारखा.. दोष दिला तरी कृपा करणारा. मग तो फक्त कामापूरता आठवण काढणारा मित्र असो, की एक सोयीचा खांदा म्हणून बघणारी मैत्रीण असो.. हा सर्वांशी चांगलच् वागणार होता, सर्वांवर प्रेम करणार होता.
आपल् हे वागणचं खरं आहे, हाच आपला स्थायीभाव आहे, हे जाणून मित्राच्या मेल ची वाट पाहु लागला.

Monday, 2 May 2016

निर्णयक्षमता

.....
...   योग्य निर्णय कसा घ्यायचा हा आपल्या सर्वांना पडणाऱ्या प्रश्नाच उत्तर मला कसं मिळाल, ह्याचा हा अनुभव..
ह्या गोष्टीचा शेवट झाला तो "स्वामी समर्थ" केंद्रात..
काही दिवसांपूर्वी माधव माझ्याकडे आला होता. बऱ्याच दिवसांपासून माझी अन् त्याची भेट झाली नव्हती.. पण तो मला नेहमी आपण भेटुयात, मला बोलायच् आहे, असा फोन करुन म्हणायचा. शेवटी आज आमची भेट झाली.
मी स्वामी समर्थ केंद्रात निघालो होतो. त्यालाही मी सोबत घेतलं. तिथे गेल्यावर दर्शन घेवून मीच त्याला बोलत केलं. त्याच्या वयाच्या, म्हणजे 25 वर्षाच्या मुलाचा जो प्रश्न असतो, तोच ,म्हणजे करियर संबधित होता. माधव जरा त्रस्त झाला होता. त्याचं शिक्षण पोस्ट ग्रॅजुएट पर्यंत झालं होतं.
पण त्याला कळत नव्हतं की पुढे काय करावं? म्हणून तो मला भेटायला आला होता.
"दादा" माधवने सांगायला सुरुवात केली. " मला निर्णय घेता येत नाहीये की, मी नेमकं काय करावं? घरचे मागे लागलेत, मी लवकरात लवकर माझ करियर सुरु कराव म्हणून .."
"म्हणजे?" मी विचारलं.
"दादा, तुला माहितीये की, मी पोस्ट ग्रॅजुअशन बरोबर गाण्याच् ही शिक्षण घेतलय. अन् मला आता कळत नाहीये की, मी एखादी कंपनी जॉइन करावी का गाण्यातचं मला सिद्ध कराव्?"
"तुझा कल कशाकडे आहे"?
"सध्या माझा कल दोन्हीकडे आहे. जर मी कंपनी जॉइन केली तर, मी भरपूर पैसे कमवु शकेन, माझी स्वप्न पूर्ण करू शकेल..ह्या मिड्ल क्लास लाइफ मधून लवकर सुटता येईल.. समाजात एक स्टेटस निर्माण होईलं, अन् लग्न ही लवकर जमेलं."
".......
"अन् गाण्यात करियर करायच म्हंटल, तर खुप स्ट्रगल करावा लागेल. सगळ अनिश्चित्त वातावरण असणार.. पण गाण मला मनापासून आवडतं. तुम्हीच सांगा मी काय निर्णय घेवू?"
खरंच ह्या प्रश्नाच् उत्तर देण जरा अवघड होत. कारण दुसऱ्या कोणाने सुचवलेल करियर तिसऱ्याने कराव्, ह्या मताचा मी नाहीये. आपला निर्णय आपणच घ्यायचा असतो, हे माधवला कसं समजाव ह्याचा विचार मी करू लागलो. मी केंद्रात आजु बाजूला नजर फिरवली.. अन् मला माधव च्या प्रश्नाच् उत्तर मिळालं.
मी माधवला समोर काय दिसतयं ह्याच वर्णन करायला सांगितल. जरा विचित्र पणे माझ्याकडे पाहून तो वर्णन करू लागला..
"काही माणसं स्वामींच्या तस्वीरी समोर बसून पठण करतायेत्.. काही औदुंबराला फेऱ्या घालत आहेतं."
"अन् ती लहान लहान मुलं आहेत, ती काय करत आहेत"?
"ती.. कुत्र्यांच्या लहान पिलां बरोबर खेळताहेत.."
"आता मला सांग.. पिलांबरोबर खेळणारी लहान मुलं आणि देवासमोर बसलेली प्रौढ़ माणस, ह्यांच्यात जास्त आनंदी, समाधानी कोण दिसतय तुला"?
"एक मिनिट दादा. मला जरा निरिक्षण करू दे".
"अरे दादा, मुलं आणि मोठी माणसं, दोघही समाधानी आणि आनंदी आहेतं"
"हेच तुझ्या प्रश्नाच् उत्तर आहे माधव. तू स्वतःला ह्यापैकी एका ग्रुप मधे ठेव. हे दोन्ही ग्रुप आपली आपली काम करत आहेत."
" लहान मूलं, आपण मंदिरात आलोय, म्हणून शांत न बसता, त्यांच्या स्वभावाप्रमाणे वागत आहेत, तर मोठी माणसं त्यांचा स्वभावा नुसार वागत् आहेत."
"तुही तुझ् करियर असंच निवड. ज्यात तुला अधिक आनंद भेटेल. क्षणिक समाधान न मिळता, टिकणार समाधान तुला कशात आहे, ह्याचा आधी विचार कर. आणि मगच् निर्णय घे. ह्यात इतर मित्र काय म्हणतील, ह्यापेक्षा तुला आणि तुझ्या घरच्यांच्या आनंदाचा विचार कर्. तुला निर्णय घेण् सोप जाईल."
माधव ला त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी उत्तर मिळाल होतं. लवकरच विचार करून, घेतलेला निर्णय कळवण्याच वचन देवून माधव समाधनाने गेला. त्याच्या निर्णयाची वाट मी बघतोय.
श्री स्वामी समर्थांनी मार्गदर्शन करून आम्हा दोघांनाही पुढच्या आयुष्यभरासाठी निर्णय क्षमता दिली होती.
(काही संदर्भ वगळता, ही कथा बऱ्याच अंशी सत्य आहे.)
गौरव नायगांवकर.

Thursday, 11 December 2014

"Alternate Paradigm " # 6 

(Continue from Alternate paradigm # 5)



“We are starting with new Dharma and New GOD." आम्हाला भयंकर आश्‍चर्यात टाकत प्रथमेश म्हणाला.
"नवीन धर्म आणि नविन देव ?" म्हणजे?" सर्वानी गोंधळून विचारल।
"संगतो. आपण step by step जावुयात।"  प्रथमेश म्हणाला.

“आता OD ची कॉन्सेप्ट आपण, ऑफ कोर्स, वेस्टर्न मॅनेज्मेंट कडून आपल्याकडे आली. पण श्रीकृष्णा ने अगोदरच OD बद्दल बोलून ठेवलय.”

पण त्या अगोदर  आपण “OD” ह्या मॅनेज्मेंट कॉन्सेप्ट बद्दल समजून घेवुयात.
प्रथमेशने ट्रेनिंग हॉल मधे असलेल्या ड्रॉयिंग बोर्डवर “मिंग्लिश” मधून  लिहायला सुरूवात केली.
                                What we exactly do in OD?
अ) Why any organisation go for OD?-  Of course, जेव्हा आपल्याला आपल्या कंपनीतला जास्त Effective  बनवायच असत, किंवा चेंजिंग कॉर्पोरेट एन्वाइरन्मेंट मधे sustain  व्हायच असत तेव्हा.

ब)Then, we identify, which factors are contributing and which are against OD? - म्हणजे  आपल्या OD  च्या ऑब्जेक्टिव ला कंट्रिब्यूट करणारे, ज्याला जनरली, “Negative Forces ”अस् उल्लेखल  जात, असे फॅक्टर्स आपण किंवा सिस्टम्स आपण ‘Delete ’ करतो.

सी) Then we find out those factors, which are necessary for OD- असे फॅक्टर्स जे OD च्या ऑब्जेक्टिव ला सपोर्ट करणारे असतात, and Optimum potential utilize करतात , एक  एफेक्टिव कल्चर तयार  करतात.

द) Considering above two, we establish an OD system to make the oragnisation more efficient.

“तुम्ही सर्व agree  आहात ह्याला?”प्रथमेश ने लिहून झाल्यावर आम्हाला विचारल.

“हो, बरोबर आहे.” आम्ही होकार दिला.

भग्वद्  गीतेताला  “यदा यदा  ही धर्मस्या ग्ला नीर् भवती  |
अभयुततनं आधर्मस्या तदात्मनात  सजम्य अहं ||4-7||
परीत्रानाया साधूनाम् विनाशाया का दुष्कृटां
धर्मा-संस्थापणार्तआया संभवामी युगे युगे ||4-8||

हे दोन श्लोक सगळ्यानी  ऐकलेलेच आहेत. ह्या दोन्ही श्लोकांचा सर्वसाधारण धार्मिक अर्थ असा आहे.- जेव्हा जेव्हा धर्माला  ग्लानी  येते, अधर्म वाढु लागतो,  तेव्हा मी, म्हणजे श्री कृष्ण अवतार घेतात. का? तर जे काही चांगल आहे, त्यांच्या रक्षणार्थ, आणि जे काही वाईट आहे , त्याच्या  विनाशासाठी.
          ह्या दिन्ही श्लोकातून अर्थ मॅनेज्मेंट च्या पर्स्पेक्टिव मधून असाही लावता येतो- 
जेव्हा धर्म म्हणजे Ethic Organistion Culture or Brand, Position, value system , Best management practices  ह्या Obsolete  किंवा Deteriorate  होतात तेव्हा, त्या रिस्टोर करण्यासाठी, आणि Evil Forces  ला नष्ट करण्यासाठी एका नवीन अवतारची गरज असते. अन हा  नवीन अवतार तुमच्यासमोर आहे.”
" असे आश्चर्याने बघू नका. मी स्वत : ला अवतार म्हणून घेत नाहीए, तर “आल्टरनेट पॅरडाइम” ला अवतार म्हणतोय. आणि अवतार म्हणजेच मॅनेज्मेंट च्या Language  मधे “Model ”. 

“तर आता आपण गीतेतले  हे श्लोक आणि OD  ची प्रोसेस ह्यांच relation  एक-एक करून डीटेल मधे Discuss  करूयात.” प्रथमेश  आता full  form  मधे आल्यासारखा  वाटत होता. 



अ) Why any organisation go for OD?- तर ,श्लोकप्रमाणे “धर्म म्हणजेच आपला Brand, Value system,culture ” इत्यादी फॅक्टर्स ला नव्याने Establish  करण्यासाठी. अमेरिकेत आपल्याला स्वताला Establish  करायाच आहे. त्यासाठी आपल्याला सध्याच्या वेस्टर्न मॅनेज्मेंट मधून बाहेर पडायच आहे. म्हणजेच  आपण आपली “आल्टरनेट पॅरडाइम” ही कॉन्सेप्ट वापरणार आहोत. ओके ? 

ब) Then, we identify, which factors are contributing and which are against OD? .-  आपण अमेरिकेत सगळ नव्याने सुरू करणार आहोत, त्यामुळे, नो डाउट, आपण OD  साठी वेस्टर्न मॅनेज्मेंट वापरु शकतो. पण तिथे सगळ काही नक्कीच सोप्प नसणार. कारण, ज्या अमेरिकन कंपनीने आपल्यासोबतच Tie-up कॅन्सल केलाय, ती Directly - Indirectly आपली Competitor  असणार. तसच, ज्या मॅनेज्मेंट च्या कॉन्सेप्ट आहेत, त्या वेस्टर्न कॉर्पोरेट कल्चर ला डोळ्यासमोर ठेऊन तयार करण्यात  आल्या आहेत. त्यामुळे आपण भारतीय जेव्हा त्या Blindly फॉलो करतो, तेव्हा फार Stress  निर्माण होतात, आपल पर्सनल लाइफ आणि प्रोफेशनल लाइफ डिस्टर्ब होत. वेग-वेगळे हेल्थ Problems  त्रास देतात. आता  आपण डाइरेक्ट अमेरिकेतच जाणार असल्यामुळे ह्या सर्व गोष्टी Multiply  होऊन आपल्यावर अफेक्ट करणार. म्हणजेच हे फॅक्टर्स “नेगेटिव फोर्सस’’ आहेत, ज्यांना मी श्लोकाप्रमाणे “ईविल फोर्सस” हे नाव दिलाय. बर, पटताय माझ म्हणन तुम्हाला?’’ प्रथमेश ने विचारल  
त्याच्या म्हणंन  सर्वांनाच  पटल  होत.  अर्थात मी नवीनच जॉइन झालेलो असल्यामुळे मला कसला आजार झाला नव्हता, पण कुठेतरी स्ट्रेस जाणवायचा  . पण इतर सर्व सीनियर टीम मेंबर्ज़ ने मात्र आपले प्रॉब्लेम 
Openly share   केले. कॉर्पोरेट लाइफ आणि- पर्सनल लाइफ मधे  सर्व बेजार झाल्यासारखे वाटत होते.

“म्हणजे “ईविल फोर्सस” आहेत तर.” प्रथमेश ने हसून विचारल .” ओके . म्हणजे OD  ची गरज आहे. तर
 आता आपण तिसऱ्या  पॉइण्ट कडे जावूयात.".


सी) Then we find out those factors, which are necessary for OD-.- ह्यात ते फॅक्टर्स असणार  जे “ईविल फोर्सस” ला मिनिमाइज़ करणार आणि  “Positive Forces ” ला वाढवणार. ह्यामधे आपले  Human Assets म्हणजे आपली हे टीम एक पॉज़िटिव फोर्स आहे. आपल्या बाकीच्या कॉन्सेप्ट पण ज्या पुढे यतीलच त्या पॉज़िटिव फोर्स असणार आहेत.

द) Considering above two, we establish an OD system to make the oragnisation more efficient. जसा श्री कृष्णाच्या “अवतार” घेतल्याने धर्माला नवसंजीवनी प्राप्त झाली, तसाच आपली ही टीम आणि “आल्टरनेट पॅरडाइम” चा वापर करून ऑड ची एक नवीन सिस्टम तयार करू शकतो जी, आपल्यात कॉन्फिडेन्स, बिलीफ निर्माण करेल आणि अमेरिकेत आपल्या कंपनीला sustain  करून Nourishment करेल."

"आता ही slide पहा।  ह्यातून तुम्हाला नीट समजेल. "



(To be continued...)





"Alternate Paradigm" # 5

(Continue from alternate paradigm # 4)


दुसर्‍या दिवशी प्रथमेश लंच नंतर आला. मी तर सकाळपासून त्याची वाट पाहत होतो. सकाळीच त्याला “Congrats” चा message ही  केला होता. 2.30 वाजता आमची नवीन टीम ट्रेनिंगहॉल मधे जमली. आता आमची टीम अशी होती- 

1. कर्णिक सर (टीम लीडर.)
2. श्री. पवार ( आमच्या अकुर्डी प्लँट चे Production हेड.)
3. श्री. जोशी ( पवार सरांचे असिस्टेंट.)
4. श्री. प्रथमेश ( OD  हेड)
5. श्री. माधव महाजन ( फाइनान्स डिपार्टमेंट, मुंबई ऑफीस )
6. श्री. मेहता ( माधव सरांचे असिस्टेंट)
7. चौधरी मॅडम (मुंबई च्या QC डिपार्टमेंट मधून)
8. मिस. कल्याणी ( चौधरी मॅम च्या असिस्टेंट.)
9. मिस. इरावती
10. श्री. आशुतोष (आमच्या Head Office चे मार्केटिंग एग्ज़िक्युटिव.)
11. अन् , मी स्वत:

म्हणजे साधारणपणे प्रत्येक डिपार्टमेंट मधले दोघेजण घेऊन एक टीम तयार करण्यात आली होती.

महाजन सरांचा एक प्रश्न होता.- “म्हणजे आपण आतापर्यंत जे मॅनेज्मेंट वापरात होतो, ते वापरणं पूर्णपणे बंद करायचं?”

“नाही.” प्रथमेशने उत्तर दिल. “ कारण मॅनेज्मेंट च्या बेसिक कॉन्सेप्ट कुठेही गेलं, तरी सारख्याच राहणार. आपण ते बदलणार नाही, तर त्या कॉन्सेप्ट एका भारतीय अप्रोचने इंप्लिमेंट करणार.”
“म्हणजे कसं?” हा प्रश्न QC च्या चौधरीमॅडमचा होता.
“म्हणजे, आपण आता मॅनेज्मेंट मधे, Leadership, Decision Making, Goal Settin, Motivation,  अशा कॉन्सेप्ट वापरतो. ह्या कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी, इंप्लिमेंट करण्यासाठी आपण “आल्टरनेट पॅरडाइम” ही थियरी वापरणार आहोत.
“माझा अजुन एक प्रश्न आहे, की, आपण फक्त भग्वद गीताच फॉलो करणार आहोत का आजुन काही ऑप्षन आहे.” चौधरी मॅडम चा दुसरा प्रश्न.
“To be Honest, माझा रिसर्च सध्या फक्त भग्वद गीता आणि स्वामी विवेकानंद ह्यांचे थॉट्स इतकाच लिमीटेड आहे. पण मला ह्यात इतर धर्मांच्या ग्रंथाचा पण अभ्यास करायचा आहे.” प्रथमेशने सांगितल.
“पण गीतेत डाइरेक्ट्ली मॅनेज्मेंट च्या कॉन्सेप्ट दिलेल्या आहेत?” हा प्रश्न चक्क इरावतीने विचारला होता.
“डाइरेक्ट नाही. कारण गीतेचा मूळ उद्देश हा धार्मिक गोष्टींचा प्रसार करण्याचा आहे. पण आपण सहजपणे गीतेच्या श्लोकातून, मूळ धार्मीक विचारांन्ना कुठेही हर्ट न करता, गीतेचं आणि इतर धर्म ग्रन्थान्चं योग्य ते पावित्र्य राखून, मॅनेज्मेंट शिकू शकतो.  अन् स्वामी विवेकानंदानचे थॉट्स तर बरेचसे मॅनेज्मेंटशी डाइरेक्ट रिलेटेड आहेत.” प्रथमेशने स्पष्टीकरण दिलं.  
“आपली प्रोसेस काय असणार आहे?” मीही एक प्रश्न विचारला.
“आजपर्यंत आपण Western management authorsला रेफर करून मॅनेज्मेंट च्या कॉन्सेप्ट समजून घेत होतो आणि इंप्लिमेंट करत होतो.  आता हेच आपण “आल्टरनेट पॅरडाइम” च्या माध्यमातून करणार आहोत. We are not going to learn new management, but we are going to learn new approach to accept and to implement the management"
“ok. पण आपण सुरूवात कशी करणार आहोत?” कर्निक सरानी विचारल.

“We are starting with new Dharma and New GOD." आम्हाला भयंकर आश्‍चर्यात टाकत प्रथमेश म्हणाला.

"Alternate Paradigm"# 4


आयुष्यात समोर काय वाढून ठेवलेल असत हे आपल्याला कधीच समजत नाही. आता हेच बघाना... मला अमेरिकेला जातआहे, हे अचानक मला समजलं. त्याच असं झालं की, ऑफीसमध्ये 2,3,दिवस नुसती गडबड चालू होती. सर्वांच्या चेह-यावर फुल्ल Tension  ..  अचानक एक दिवस गोडबोले सरांनी मला, ईरावातीला, एक marketing executive-  आशुतोष, आम्हाला लंचनंतर ट्रेनिंग हॉल मधेजमायला संगितल. लंचमधे मी पाहील की, आमच्या ईतर प्लॅंट्समधून पण काहीजण आले होते, जे आम्हाला लंचनंतर ट्रेनिंग हॉलमधे जॉइन झाले.
 बरोबर 2.30 वाजता कर्णीक सर, गोडबोले सर, आणि प्रथमेश ट्रेनिंग हॉलमधे आले. 
कर्णिक सर बोलायला ऊभे राहीले. त्यानी आम्हाला आत्ता जे सांगितल, ते कंपनीच्या दृष्टीने नक्कीच चांगल नव्हतं. आमचं ज्या अमेरिकन कंपनीबरोबर tie-up  होणार होतं, त्यानी काहीतरी कारण सांगून withdraw केलं होतं. गेले 2,3 दिवस त्याबद्दलच मीटिंग्स चालू होती. आम्हाला, ज्याना आत्ता बोलवलहोत, त्याना एक नवीन जबाबदारी देण्यात येणार होती. जर आम्ही सर्व तयार असलो तर, कंपनी अमेरिकेत आपला नवा प्लँट सुरू करणार होती. पण प्रश्न इतकाच नव्हता, तर अमेरिकेत जाऊन, तिथे शून्यापासून सगळ करायच होत. त्यासाठीच आमची ही टीम करण्यात आली होती. आता आम्हाला ठरवायच होत की आम्ही ही मोठी जबाबदारी घ्यायला तयार आहोत की नाही? कर्णीक सर स्वत: आमची टीम लीड करणार होते. गोडबोले सर इथेच राहून हेड-ऑफीस सांभाळणार होते. सगळ्यांनी लगेच होकार दिला. (अमेरिकेला जायला मिळ्नार म्हणून बहुतेक, कारण मी त्यामुळेच हो सांगितल होत. माझ लॉजिक फार चालत.)

सर्वांचा होकार आल्यानंतर कर्णिक सरांनी प्रथमेशची ओळख इतर नवीन लोकांना करून दिली. 

 पण आमच्या ह्या नवीन टीम मधले जे नवीन मेंबर होते, त्यानी प्रथमेश कशासाठी हवा? असा प्रश्न ठेवला. त्यांच म्हणंन होतं की, आपण जर अमेरिकेत जाणार आहोत, तर तिथे अशा ‘नवख्या’ ट्रेनर च्या ऐवजी, एखाद्या एक्सपीरियेन्स्ड ट्रेणार ला घेऊन जाव. 
त्यांच म्हणन पण बरोबर होत. कारण आम्ही “अमेरिकेत” जाणार होतो, अन् अशावेळी तिथल्या कॉर्पोरेट कल्चरला मॅच होणार आपल मॅनेज्मेंट हव अस त्यांच म्हणंन पडलं. अस “भारतीय” मॅनेज्मेंट तिथे टिकूच शकणार नाही, अस त्यांना वाटत होत.  तिथे जाऊन स्वत:च "हसं "करण्यापेक्षा न गेलेलचचांगल होईल अस ही त्यांनी सुचवल. मघाशी अमेरिकेत जाण्याच्या कल्पनेने आम्ही खुश झालो होतो, पण आता, नकळत सगळ्यांच्या मनावर ताण आला होता.

मी प्रथमेशकडे पाहीलं, पण त्याला ह्याचा काहीच ताण नसल्याच जाणवल मला. तो आपला मस्त आरामात बसून प्रत्येकाच ऐकत होता. म्हणजे असा विरोध होईल, हे त्याने गृहीतच धरलेल असणार. ह्यावर कर्निक सरांनी प्रथमेशला त्याच म्हणंन मांडायला सांगितल...

सर्व आता प्रथमेशकडेच बघत होते. त्याने नेहमीप्रमाणे प्रसन्न हसून बोलायला सुरूवात केली
.“दुसर्‍या वर्ल्ड- वॉर मधली एक घटना सर्वानां माहिती आहेच, ती म्हणजे जपानवर टाकण्यात आलेला न्यूक्लियर बॉम्ब. जपान ह्यात ऑलमोस्ट बेचिराख झाला होता.( डाइरेक्ट विषय न काढता, सुरूवात काहीतरी वेगळी करायची प्रथमेशची सवय मला समजली होती.)  त्यामुळे अमेरिकेने डेमिंग आणि जुरान ह्या दोन Management Experts ला जपान ला पाठवल, जपानची सर्वच बाबतीत, Especially,  मॅन्यूफॅक्चरिंग फील्ड मधे मदत करण्यासाठी. साधारणत: पहिली काही वर्ष जपानी लोकांनी सर्व शिकून घेतल, पण साधारणत: 10-12 वर्षानी डेमिंग आणि जुरानच्या लक्ष्यात आल की, जपान आपल्या एक्सपेक्टेशन पेक्षा खूपच पुढे गेला आहे. त्यानी  ह्या मागच रीज़न शोधल अं ते होत- Kaizen, एक Japanese फिलासॉफी, ज्याचा उपयोग करून जॅपनीज इंडस्ट्री युरोप आणि अमेरिकेच्या पण पुढे निघाली होती.Kaizen  ही फिलासॉफी त्यांच्या संस्कृतीचाच एक भाग आहे, जो त्यानी  एजुकेशन,  हेल्थकेअर, मॅन्यूफॅक्चरिंग, पब्लिक सर्वीसज़, ह्यासर्व ठिकाणी वापरली आहे, अन् त्याचा झालेला चांगला परिणाम आपण आपल्या डोळ्यांनी  पाहताच आहोत. 

आपली कंपनी  पण आता फॉरिन मार्केट मधे जात आहे, ज्यांच्या बरोबर आपल Tie-up होणार होत, ते आता तयार नाहीयेत. अशा परिस्थितीत आता आपल्यालाच  सर्व मॅनेज करायचाय.  कर्निकसरांचा आग्रह आहे की, आपण फॉरिन मार्केट मधे जाताना काही तरी “भारतीय” घेऊन जावं. जपानी लोकासारखी जगाला एक देणगी द्यावी. आपली ही “भारतीय” मॅनेज्मेंट ची फिलासॉफी, ही आपली ओळख बनावी, हा एक “Brand” बनावा. एक असा मॅनेज्मेंट अप्रोच जो आपला स्वत:चा असेल, आपल्या भारताच्या मातीतला, जो आपल्या Genes मधे पिढ्यान-पिढ्या रुजलेला आहे.” 
   
प्रथमेशने आपलं बोलणं पुढे चालू ठेवलं- “मला माहिती आहे,हे सर्व तुम्हाला नवीन वाटतयं .आक्सेप्ट करायला पण अवघड जाईल. कारण “ भारतीय धर्म, संकल्पना,आणि विचार”, हे आउटडेटेड आहेत,बुरसटलेले आहेत, असा आपलाच गैरसमज झालाय. इम्पोर्टेड तेवढाच चांगल ह्यावर आपल इतका विश्वास बसलाय की, आपण आन्धळेपनाने वेस्टर्न कल्चर फॉलो करतोय. एक लक्ष्यात घ्या की, मी वेस्टर्न कल्चर किंवा वेस्टर्न मॅनेज्मेंटला ‘वाईट’ म्हणत नाहीए, तर माझा emphasis  आपल्या कल्चर वर जास्त आहे. ते जास्त ‘चांगल’ आहे हे माझ मत आहे. आपणच आपल्या कल्चर कडे डोळे-झाक केल्यामुळे, आज आपल्याला अमेरिकन लोक आयुर्वेदाचे  गुणधर्म सांगत आहेत, योगासने शिकवत आहेत. आता आपण, ह्या भारताने जगाला “ज्ञान” देण्याची आवश्यकता आहे.  जे जपान सारख्या बेचिराख झालेल्या देशाला जमल, ते आपल्या महान देशाला नक्कीच जमणार, असा मला विश्वास आहे. कारण Tie-up कॅन्सल झाल्यामुळे तुम्ही निराश न होता, मोठ्या उमेदीने अमेरिकेत जायला होकार दिलात, म्हणजेच आपल्या ह्या टीम मधे नक्कीच चांगल करून दाखवायचे गट्स आहेत. आपल्या टीमच हे नवीन  “भारतीय मॅनेज्मेंट” नक्कीच संपूर्ण जगाला एक देणगी ठरणार. ”  प्रथमेशने बोलणं थांबवल, तसं सर्वांनी टाळ्या वाजवल्या. ह्याच अर्थ सर्वांना त्याच म्हननं पटलं होत. मी तर एकदम फॅन झालो होतो त्याचा. कर्निक सर पण कौतुकाने त्याच्याकडे पाहत होते.



आता आमच्यात पण ह्या भारतीय मॅनेज्मेंट बद्दल उत्स्साह निर्माण झाला होता. 
नक्कीच, आम्ही सर्व प्रथमेशच्या बोलण्याने कन्विन्स झालो होतो. आम्हाला मनापासूनआता आपल भारतीय मॅनेज्मेंट असाव, असं वाटत होत. आज पर्यंत आपण दुसर्‍याकडून मिळालेल्या ज्ञानावर जगतं होतो, पण आज आम्हाला संपूर्ण जगासमोर आपल्या भारताची महानता नेऊन ठेवायची संधी होती.  वर्ल्ड कप जिंकल्यावर मला जसं वाटलं होत, तसाच Feel  आताही होत होता.. आमची पूर्ण टीम super-excited  होऊन उद्याच्या ट्रेनिंग ची वाट पाहत होती...